Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या कल्पना उदयसिंह मुळीक यांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे. प्रभागातील विविध भागांत त्या नागरिकांशी थेट संवाद साधत असून ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.
प्रभाग क्रमांक ४० मधील अपक्ष उमेदवार कल्पना मुळीक यांनी प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात केली. प्रचारादरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
कल्पना उदयसिंह मुळीक या निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी ऐकून त्या सोडवण्यासाठी ठोस भूमिका मांडत आहेत. अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
उदयसिंह मुळीक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. गरजू नागरिकांना मदत, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन, महिलांसाठी उपक्रम तसेच युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. या सामाजिक कार्यामुळेच आज त्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
निवडणुकीसाठी त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘छत्री’ असून, या चिन्हावर मतदान करून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन कल्पना उदयसिंह मुळीक यांनी नागरिकांना केले आहे. “सामाजिक कामाचा अनुभव आणि नागरिकांचा विश्वास हाच माझा खरा आधार आहे. निवडून आल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


Recent Comments