Homeपुणेभाजपची मोठी खेळी, पुण्याच्या महापौरपदी महिला चेहरा, तर RPI आठवले गटाला दिले...

भाजपची मोठी खेळी, पुण्याच्या महापौरपदी महिला चेहरा, तर RPI आठवले गटाला दिले महत्त्वाचे पद

Newaworldmarathi Pune: पुणे महापालिकेत भाजपने मास्टरस्ट्रोक खेळत महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड केली आहे. आरपीआयला महत्त्वाचे पद देऊन भाजपने आगामी निवडणुकीसाठी सामाजिक समतोल कसा साधला, याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सर्वांचेच लक्ष महापौर कोण होणार याकडे लागले होते. पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली. भाजपच्या मंजुषा दीपक नागपुरे यांची पुण्याच्या नव्या महापौर म्हणून वर्णी लागली. तर आरपीआयचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारला. विरोधी पक्षांनी शेवटच्या क्षणी आपले अर्ज मागे घेतल्याने ही प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

पुणे महापालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने मंजुषा नागपुरे यांची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात होती. मात्र, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) उपमहापौर पद देऊन भाजपने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनी सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु सत्ताधारी बाकांवरील संख्याबळ आणि बिनविरोधची परंपरा कायम राखण्याच्या आवाहनानंतर विरोधकांनी माघार घेतली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments