Newaworldmarathi Pune: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या तब्येतीबाबतची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवार हे बारामतीतील आपल्या ‘गोविंद बाग’ या निवासस्थानातून पुणे शहराच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून डॉक्टरांकडून तपासणीनंतरच पुढील स्थिती स्पष्ट होणार आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना राज्यभरातील नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



Recent Comments