Homeपुणेनगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णय; नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले;...

नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णय; नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले; गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २५ (ब) मधून नवनिर्वाचित झालेले भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी एक आदर्श निर्णय जाहीर केला आहे. नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन आणि इतर सर्व प्रकारचे भत्ते स्वीकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला असून, ही मानधनाची रक्कम ‘महापौर निधी’ला वर्ग करण्याबाबतचे पत्र देत, शहरातील गरजू रुग्णांच्या मदतीसाठी खर्च करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९ (अ) १ अंतर्गत निर्वाचित सभासदांना मिळणारे मानधन आपण स्वीकारणार नसल्याचे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. या मानधनाची रक्कम दरमहा ‘महापौर निधी’ मध्ये जमा करण्यात यावे आणि त्यातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे.

आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले की, “राजकारण हे माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम आहे. नगरसेवक पद हे या सेवेसाठी ताकद देणारे पद आहे. प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचे मानधन घेणे मला पटत नाही. त्यांनी दिलेल्या या संधीच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून येणारे मानधन हे त्यांच्या सेवेसाठी खर्च व्हावे या भावनेतून मी हा निर्णय घेतला. अनेकदा गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. माझ्या मानधनाचा विनियोग अशा रुग्णांच्या सेवेसाठी झाल्यास त्याचे मला अधिक समाधान मिळेल.”

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments