Newsworldmarathi Pune: मॉडेल कॅालनी वॅार्ड क्रमांक १२ दिवाळी हा दिव्यांचा सण असला तरी खरा आनंद हा आपल्या माणसांना भेटण्यात आहे, हा संदेश देत नगरसेविका पूजा प्रतुल जागडे यांनी प्रभागात एक आगळा-वेगळा उपक्रम राबविला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून प्रभागातील प्रत्येक वाडी-वस्ती, सोसायटी आणि गल्ली-बोळात जाऊन नागरिकांना प्रत्यक्ष भेटून दिवाळीच्या शुभेच्छा व भेटवस्तू देण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या उपक्रमात केवळ भेटवस्तू देण्यापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता, नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या जात आहेत.
“ही केवळ दिवाळी भेट नाही, तर जनतेशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा आणि विश्वासाचे बंध जपण्याचा एक प्रयत्न आहे,” असे पूजा जागडे यांनी यावेळी सांगितले. नागरिकांकडून मिळणारे प्रेम, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपुलकी हीच आपल्याला जनसेवेसाठी नवी ऊर्जा देते, अशी भावनाही त्यांनी या भेटीच्या वेळी व्यक्त केली आहे.
सणाच्या धावपळीतही वेळ काढून नगरसेविका स्वतः दारात येतात, याचे नागरिकांमधून विशेष कौतुक होत आहे. केवळ राजकीय नेता म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून त्या प्रत्येकाशी संवाद साधत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आपली माणसं, आपला प्रभाग आणि जनसेवेचा अखंड संकल्प हा ध्यास घेऊन काम करणाऱ्या नगरसेविका पुजा प्रतुल जागडे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


Recent Comments