Newsworld marathi Mumbai : अजित पवारांचे निकटवर्तीय इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यामध्ये मंत्रीपदाची माळ आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात अजित पवारांच्या गटांमध्ये 41 आमदार निवडून आले आहेत त्यामध्ये केवळ एकमेव धनगर समाजाचे आमदार म्हणून दत्तात्रय भरणे निवडून आल्याने त्यांना संधी मिळणार आहे.महायुतीचा सरकारमध्ये देखील अजित पवार यांनी भरणे यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यांना पीडब्ल्यूडी मिनिस्टर केले होते. याचबरोबर त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील सोपवली होती. भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाची हॅट्रिक मारली आहे. त्यामुळे त्यांनाही संधी दिली जाणार आहे याच बरोबर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचेतील संघर्ष कधीही लपून राहिलेला नाही. दत्तात्रय भरणे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूरमध्ये तीन तीन सभा घेतल्या होत्या मात्र तरी देखील भरणे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने त्यांना ही संधी दिली जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.