Homeआंतरराष्ट्रीयलोकसभेत ‘एपस्टिन फाईल्स’वरून राहुल गांधींचा आरोप

लोकसभेत ‘एपस्टिन फाईल्स’वरून राहुल गांधींचा आरोप

Newaworldmarathi New Delhi: लोकसभेत बजेटवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एपस्टिन फाईल्स’, अनिल अंबानी, अदानी आणि भारत-अमेरिका व्यापार कराराचा उल्लेख करत केंद्र सरकारवर टीका केली. अनिल अंबानी यांचे नाव एपस्टिन फायलींमध्ये असल्याचा दावा करत ते अद्याप तुरुंगात का नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसेच केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावरही ओळख करून दिल्याचा आरोप केला. संरक्षण अंदाजपत्रकात अदानी समूहाचा दबाव दिसत असल्याचेही ते म्हणाले.

यावर पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी सभागृहात अनुपस्थित व्यक्तींची नावे घेण्यास हरकत घेतली, तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा आरोप करत संबंधित वक्तव्ये कार्यवाहीतून वगळली जातील, असे स्पष्ट केले. दरम्यान, हरदीप पुरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना एपस्टिनशी केवळ औपचारिक बैठकींपुरते संबंध असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्रांतील कार्यकाळानंतर इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना ओळख झाली होती; संबंधित प्रकरणांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments