पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवून मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. डिप्लोमा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला तिच्या संमतीशिवाय व्हॉट्सअॅपवर अश्लील मजकूर पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित संदेशांना प्रतिसाद न दिल्यास अंतर्गत परीक्षेतील ३० गुण आपल्या नियंत्रणात असल्याचे सांगून दबाव टाकण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपी प्राध्यापकाविरोधात ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती समोर येताच माळेगाव शहरासह बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिक्षकी पेशावर डाग लावणाऱ्या या प्रकाराबद्दल पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, संबंधित महाविद्यालय प्रशासनानेही अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली


Recent Comments