Homeभारतलग्न समारंभात पुस्तके आणि रोपटे देऊन मान्यवरांचा सत्कार; एक अनोखा सामजिक उपक्रम

लग्न समारंभात पुस्तके आणि रोपटे देऊन मान्यवरांचा सत्कार; एक अनोखा सामजिक उपक्रम

Newaworldmarathi Pune : सध्याच्या युगात लग्न समारंभात बेफाम खर्च करीत मान्यवरांना हार- फुले देऊन सत्काराचा खर्च केला जातो. मात्र या परंपरेला फाटा देत अकोले येथील सुबनावळ आणि सुर्यवंशी कुटुंबाने लग्न समारंभात पुस्तक आणि रोपटे देऊन आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

अकोले (इंदापूर)येथील प्रतिष्ठित नागरिक गणेश सुबनावळ (सरचिटणीस पुणे जिल्हा युवक काँग्रेस) यांच्या विवाह समारंभात आलेल्या मान्यवरांना यावेळी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, शहीद भगतसिंगांचे तरुणांना आव्हान ,मी नास्तिक का आहे,देशावर फॅसिझम चे संकट,भेदाभेद भ्रम अमंगळ ,विवेकवादी विज्ञानवादी, समाजवादी विवेकानंद, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज , आपले संविधान या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.या उपक्रमामुळे तरुण मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल तसेच भरमसाठ खर्चाला आळा घालून असे उपक्रम केल्यास एक चांगली सवयी लागेल असे. आण्णासो सुबनावळ यांनी शुभ विवाह प्रसंगी सांगितले. यावेळी २०० पुस्तके आणि २०० रोपटी देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments