Homeपुणेदहशत माजविणाऱ्या गुंडांचा माज उतरवला! कोंढवा येवलेवाडी पोलिसांच्या कडक कारवाईने नागरिकांना दिलासा

दहशत माजविणाऱ्या गुंडांचा माज उतरवला! कोंढवा येवलेवाडी पोलिसांच्या कडक कारवाईने नागरिकांना दिलासा

Newaworldmarathi Pune: कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री दुचाकींवरून आलेल्या सुमारे १२ तरुणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या टोळक्याने भरधाव वेगात रॅश ड्रायव्हिंग करत नागरिकांना त्रास दिला, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या दोन निष्पाप व्यक्तींना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली.

या घटनेत बँक कर्मचारी मयूर गायकवाड यांच्यावर टोळक्याने अचानक हल्ला केला. त्यांच्या मानेवर पट्ट्याने प्रहार करण्यात आला. त्यानंतर समोरून येणाऱ्या सायपन शेख (वय १८), जो ‘मिशो’ कुरिअर सेवेत काम करतो, यालाही लक्ष्य करण्यात आले. आरोपींपैकी एकाने त्याच्या छातीवर जोरदार वार केला. गायकवाड यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र टोळके दुचाकींवरून वेगाने पसार झाले.

मारहाणीनंतरही टोळक्याचा उच्छाद सुरूच राहिला. गल्ली क्रमांक ११ मधील पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. स्थानिक रहिवासी महामुनी यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावले.

घटनेनंतर तक्रारदार आणि स्थानिकांच्या मदतीने काही आरोपींची ओळख पटली असून, ओंकार पांचाळ, सोन्या जाधव, हर्षल, अभि दीक्षित, प्रसाद शिंदे यांच्यासह इतरांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी कोंढवा बुद्रुक परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा येवलेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांवर वचक बसवला. ज्या ठिकाणी गुंडांनी दहशत माजवली, त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढण्यात आली.

पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांना अजिबात सूट दिली जाणार नाही. परिसरात शांतता राखण्यासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ही राबवण्यात आले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments