Newsworld Pune : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीत नवजात बालकाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बालकाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती.
काल रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ सिंहगड पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नवजात बालकाला त्वरित ससून रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सिंहगड पोलीस अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून बालकाच्या पालकांचा शोध घेत आहेत. या अमानवीय प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.