Newsworld Pune : बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील होणार्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. गंज पेठेतील लहुजी वस्ताद साळवे तालीमपासून हा मोर्चा निघाला. सुमारे ५०० ते ५५० हिंदू बंधू भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते.
बांगलादेश निर्माण झाल्यानंतर ठरलेल्या कराराप्रमाणे त्या देशातील धार्मिक स्थळे सुरक्षित राहून अल्पसंख्यांक नागरिक सुरक्षित राहतील, या अपेक्षेने हजारो हिंदू कुटुंबीय बांगलादेशमध्ये स्थिरावले. मात्र, या अपेक्षांचा भंग झाल्याचे सध्या दिसून येत आहे. अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली पुरातन मंदिरांची, मूर्तीची तोडफोड केली जाते.
हिंदू महिलांवर बलात्कार केले जात आहेत. तसेच त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून ठार मारण्यात येत आहे. हिंदूंच्या तसेच दलित बांधवांच्या मालमत्ता जमिनी अवैद्य मार्गाने बळकावून तसेच त्यांना बेघर केले जात आहे. त्याचप्रमाणे शत्रू संपत्ती अधिनियम बांगलादेशमध्ये कायदा आणला गेला असून तेथील मूळनिवासी हिंदूंना, हिंदू हे मुसलमान राष्ट्राचे शत्रू असल्याचे जाणीव करून कायद्याचा धाक दाखवून त्यांची जमिनी, घरे हडप केली जात आहे.
तसेच या कायद्यामुळे तेथील मुसलमान समाजाच्या मनात हिंदू बद्दल द्वेष भावना प्रबळ केली जात आहे. या कायद्यामुळे हिंदू नागरिकांचे नागरिकत्वाचे अधिकार देखील, शत्रू राष्ट्राचे लोक म्हणून जबरदस्तीने काढले जात आहे. मूलभूत सरकारी सुविधा योजना त्या ठिकाणच्या हिंदूंना नाकारण्यात येत आहे. बहुसंख्य मुसलमान समाजाने अत्याचार केल्यास कायद्याने त्या मुसलमान नागरिकांना शिक्षा दिली जात नसल्याने हिंदूंचे जगणे अवघड बनले आहे. हिंदूंच्या धार्मिक प्रथा, रितीरिवाज, सण,कार्य यांचे पालन करून दिले जात नाही.
तसे केल्यास त्यांचा सरकारी यंत्रणा त्याचप्रमाणे तेथील बहुसंख्य नागरिकांकडून अमानुष छळ होत आहे. त्यामुळे आता हिंदूंना त्याठिकाणी धर्मांतरण करणे अथवा पलायन करणे इतकेच मार्ग शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे या हिंदू बांधवांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ सर्व जगातील हिंदूंनी यापुढील काळात एकत्रित येण्याची गरज आहे आणि बांगलादेश मधील हिंदू बांधवांना वाचवणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.