Newsworldmarayhi Baramati: अकोले प्रीमियर लिगच्या मैदानावर सदाहरि क्रिकेट टीमने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात बाजी मारली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी करत सदाहरि संघाने प्रतिस्पर्ध्याला चांगलेच झुंजवले. सामन्यातील प्रत्येक क्षणी खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, आत्मविश्वास आणि सांघिक भावना यामुळे विजयावर शिक्कामोर्तब झाले.
सदाहरि संघाकडून सुदाम खाडे, आकाश खाडे (कर्णधार), नामदेव आव्हाड, निलेश सोन्ने
दीपक दराडे, दत्तू दराडे, हर्षद खाडे, तेजस खाडे, अविनाश पवार, तानाजी खामकर आणि आर्यन कांबळे यांनी मैदानावर दमदार योगदान दिले. निर्णायक क्षणी खेळाडूंनी दाखविलेली चिकाटी आणि संघासाठी केलेला संघर्ष विजयासाठी महत्त्वाचा ठरला.
संघाच्या या यशामागे संघमालक सागर मोरे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. तसेच विजय खाडे, संजय खाडे, दत्तू मोरे, समीर सोन्ने आणि प्रथमेश आव्हाड यांनी संघाला दिलेले पाठबळ आणि प्रोत्साहन उल्लेखनीय ठरले.
सामन्यातील प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावेबरोबर वाढत गेलेली उत्सुकता अखेर सदाहरि संघाच्या विजयाने संपली. विजय मिळताच खेळाडूंनी मैदानावर जल्लोष केला. समर्थकांनीही आनंदोत्सव साजरा करत आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.
सदाहरी संघाच्या या विजयामुळे अकोले प्रीमियर लिगमध्ये त्यांचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, आगामी सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.


Recent Comments