Homeपुणेसिंहगडरोड पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

सिंहगडरोड पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

Newsworldmarayhi Pune : सिंहगडरोड पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान एका रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई ११ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार, सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि युवराज कांबळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एक व्यक्ती अंगात काळ्या रंगाची टी-शर्ट व पांढऱ्या रंगाची पँट परिधान करून विश्व्रांतीनगरकडून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शंकर मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, सिंहगडरोड परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेली असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके यांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांना पाहून संशयित व्यक्ती तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सिद्धेश सुरेश पवार (वय ३१), रा. बिल्डिंग नं. ८ बी, पहिला मजला, विश्व्रांतीनगर, हिंगणे खुर्द, पुणे, असे सांगितले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके करीत आहेत.

सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे,अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३ डॉ. सागर कवडे सहा पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, भुपेश साळुंके, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, प्रफुल्ल चव्हाण, सतिश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, युवराज कांबळे सागर शेडगे, विनायक मोहिते, तानाजी सागर, शिरीष गावडे यांचे पथकाने केली आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments