Newsworldmarathi Pune : ‘Ironman Triathlon’ हि जगातील अतिशय अवघड स्पर्धेमध्ये पुण्यातील ४१ वर्ष्याच्या समृद्धी कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून भारताचा झेंडा ऑस्ट्रेलियामध्ये फडकावला. हि स्पर्धा त्यांनी आधीही कझाखस्तान येथे यशस्वी रित्या पूर्ण केली होती. आयर्नमॅन ट्रायथलॉन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या लांब पल्ल्याच्या ट्रायथलॉन शर्यतींपैकी एक आहे.
जगभरातील अनेक देशांत आयर्न मॅन स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत पुणे शहरातील साधारण १२ ते १५ स्पर्धक सहभागी झाले होते त्यात समृद्धी या एकमेव महिला (४० ते ४४ वर्ष वयोगटातील) स्पर्धक होत्या. हि स्पर्धा खूप कठीण असते, यामुळे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या देखील कमी असते. या वयोगटात जगभरातील फक्त ३८ महिला ही स्पर्धा पूर्ण करू शकल्या तर समृद्धीने भारतीय महिलांच्या यादीत १ ला क्रमांक तर अंतरराष्ट्रीय यादीत १६ वा क्रमांक मिळविला. या आधी त्यांनी कझाकस्तान मध्ये पहिली Iroman स्पर्धा पूर्ण केली होती. याच बरोबर अल्ट्रा रनिंग जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन 90 किमी दक्षिण आफ्रिकेत देखील दोनदा पूर्ण केली.
तीन वेळा भारतीय बर्गमन ट्रायथलॉन स्पर्धांमध्ये त्या विजेत्या ठरल्या आहेत. २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा मंत्री श्री. सुनील केदार यांच्या हस्ते क्रीडा राज्ञी पुरस्कार व पुण्याचे पालकमंत्री आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सन्मानचिन्ह प्राप्त केले आहे.
एकदा ध्येय निश्चित झाले आणि ते गाठण्याची जिद्द निर्माण झाली की ते पूर्ण करण्यासाठी कसोटीने प्रयत्न करणे हेच समृद्धी कुलकर्णी यांनी यशाने सिद्ध करून दाखवले. अडथळे येणे हा या सगळ्याचा भागच आहे पण त्याही पुढे जाऊन आत्मविश्वास आणि जिद्दीने यश मिळवणे हे स्वतासाठीं फक्त नसून पुढील पिढी साठी व समस्त स्त्रियांना एक उदाहरण होण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
आयर्न मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातील १७०० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी ११०० जणांना ही स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यात यश आले. तर या ११०० जणांमध्ये समृद्धी कुलकर्णी या एक होत्या. ३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे हे सलग १७ तासामध्ये पूर्ण करण्याचा आयोजकांचा नियम आहे. मात्र, समृद्धी कुलकर्णी यांनी १३ तास २३ मिनिट आणि २७ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.
आयर्न मॅन स्पर्धेतील अनुभवाबाबत समृद्धी म्हणाल्या की, त्यांचे कुटुंब हे या स्पर्धेसाठी प्रेरणास्थान आहेत. रनिंग ची आवड निर्माण २०१७ मध्ये झाली आणि मुलीबरोबर स्विमिन्ग शिकावयास चालू केले २०२१-२०२२ मध्ये, सायकल नवीन घेणे ते कॉम्पेटेटिव्ह सायकलिंग करण्याचा धडपड हि अनुभवली.
प्रशिक्षक, कुटुंब, मित्र परिवार आणि माझे सहकारी माझ्या बरोबर कायम असल्यामुळे मला हे यश मिळवता आले. विशिष्ट ध्येय ठेऊन प्रयत्न केले तर यश हे मिळतेच हा विश्वास या स्पर्धामधून दृढ होतो. समस्त स्त्री समाजाने जमेल त्या पद्धतीने स्वतःला फिट अँड निरोगी ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, माझा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये भागघेऊन जगभरात भारताचा झेंडा फाकावण्याचा मानस आहे.