Newsworldmarathi Pune: पुण्यामध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या ३२ गावांनी पुणे महापालिकेला किती मिळकत कर दिला? आणि महापालिकेने काय सोयी सुविधा उपलब्ध करून दिला? पुणे महापालिका आयुक्तांनी या गावांबाबत कोणताच निर्णय घेतला नाही त्यांच्याकडे ती क्षमताच नाही अशी खरमरीत टीका खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसेभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
पुणे शहराच्या चोहू बाजूने असलेल्या ३२ ग्रामंपंचायती पुणे महापालिकेत विसर्जित करून पुणे शहाराचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे या गावांचा महसुली कर ग्रामपंचायत ऐवजी महापिलेकत जमा होत आहे. ३२ गावांतून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे मात्र त्या तुलनेत या गावांमध्ये ना रस्ते, ना ड्रेनेज, ना शुध्द पाणीपुरवठा महापालिकेत पुरवते आहे, त्यामुळे या गावांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून अनेकवेळा आंदोलन केले आयुक्तांना निवेदने दिली आहेत. मात्र आयुक्तांनी त्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आमदार भीमराव तापकीर यांनी ३२ गावांचा प्रश्न विधानसभेत विचारला.
आमदार तापकीर म्हणाले की, ३२ गावांनी मिळून महापालिकेला आत्तापर्यंत किती टॅक्स दिला आहे. तो आकडा मंत्रीमहोदयांनी द्यावा तो आता उपलब्ध नसेल तर तातडीने या गावांच्या समस्या सोडविण्यासाठी एक बैठक घ्यावी आणि त्यावेळी या गावातून मिळालेले महसूली उत्पन्न सांगावे. गावनिहाय कराची रक्कम सांगावे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत तातडीने बैठक घेण्याची सुचना मंत्री उदय सामंत यांना दिली.
कौशल्य विकास केंद्र लवकरच
तब्बल १९० कोटी रुपयांचे देशातील सर्वात मोठे कौशल्य विकास केंद्र पुण्यामध्ये लवकरच होणार आहे. उद्योजक रतन टाटा हयात असताना याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी १६० कोटी रुपये टाटा ग्रूपकडून सीएसआर व्दारे मिळणार आहे तर उर्वरित रक्कम पुणे महापालिका देणार आहे. याची बैठक लवकरच होणार असून त्या बैठकीला सर्वांना बोलाविण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
Newsworldmarathi Pune : पुणे हे विद्येचं माहेर घर असून येथे देशासह जगभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. राज्यातील विविध ठिकाणांहून लाखो तरूण येथे चांगेल शिक्षण मिळते म्हणून पुण्याची वाट धरतात. तर पुणे विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून कसूनन तयारी करतात. मात्र आता याच सावित्रीबाई फुले विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुलींच्या वसतीगृहात दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेटची पाकिटं सापडली आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठमधील मुलींच्या वस्तीगृहात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात दारू आणि धूम्रपान केलं जात असल्याचं उघड झाले आहे. हा प्रकार वसतीगृहातील मुलींकडूनच सुरू असल्याचा आरोप एका विद्यार्थीनी केल्याने समोर आला आहे.
विद्यापीठातील मुलींच्या वस्तीगृहात मुलींकडूनच मद्यप्राशन आणि धूम्रपान सुरू होता. याबाबत वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृह महिला अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. एनेकदा तक्रार करूनही यावर कोणताच तोडगा निघत नव्हता. यामुळे संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्रातून सर्व घटनाक्रम सांगितला. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप त्या मुलीने केला आहे.
दरम्यान आता विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहामध्ये मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं आढळून आलेली आहेत. मुलींच्या रुममधील काही फोटो आता समोर आली आहेत. यामुळे विद्यापीठात नेमकं काय सुरूय असा सवाल उपस्थित होत आहे.
तर संबंधित मुलीने जुलै महिन्यापासून तिच्या रुममेट्सने तिला अंमली पदार्थांचे सेवन करुन त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच या मुलींच्या दारु, सिगारेटमुळे मायग्रेनचा त्रास झाला असून मानसिक आणि शारिरीक छळ केला जातोय असाही दावा तीने केला आहे. याच या त्रासाला कंटाळून तिने वारंवार तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर कोणतीच कारवाई झाली नाही.
Newsworldmarathi Pune : हिंजवडी फेज 1 मध्ये आज (दि. 19 मार्च) सकाळी भीषण अपघात घडला. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलर टेम्पोला अचानक आग लागली. या दुर्घटनेत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळी सुमारे ८ वाजता टेम्पो हिंजवडी फेज वनमध्ये जात असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच चालक आणि समोरील कर्मचारी गाडीतून तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता आला नाही, त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
या घटनेत इतर काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, टेम्पोच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असावी. तसेच, गाडीच्या मागील दरवाज्याच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे.
सुनीता विल्यम्सची परती
सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत.
Oplus_131072
पहाटे लँड
19 मार्चला पहाटे त्यांचे यान पॅरॅशूटने पृथ्वीवर लँड झाले.
Oplus_131072
फ्लोरिडा समुद्र
स्पेसएक्सचे ड्रगन यान फ्लोरिडा समुद्रावर पॅरॅशूटने लँड झाले.
Oplus_131072
मोठा पॅरॅशूट
या फोटोमध्ये तुम्ही हा भला मोठा पॅरॅशूट पाहू शकता जो ड्रॅगनला कॅरी करताना दिसतोय.
Oplus_131072
डॉल्फिनने केले स्वागत
या ऐतिहासिक क्षणात चक्क डॉल्फिनने सुनीता विलियम्सचे स्वागत केले.
Oplus_131072
ड्रॅगन कॅप्सुल
नंतर या ड्रॅगन कॅप्सुलमधून अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले.
Oplus_131072
जगभर आनंद
सुनीता विलियम्सच्या पृथ्वीवर सुखरूप परतीने जगभर आनंद साजरा केला जात आहे.
Oplus_131072
Newsworldmarathi Pune: जिल्हा परिषदेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प उद्या गुुरुवारी (दि़ १९ ) सादर केला जाणार आहे़. दरम्यान अर्थसंकल्पात यंदा कोणत्या नाविन्यपुर्ण योजना सादर केल्या जाणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक योजनांना कात्री लावली होती़, मात्र यंदा वैयक्तिक
योजनांचा समावेश केला आहे का, याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे़.
जिल्ह्यात भेडसावत असणाºया कचरा, सांडपाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात काही तरतुदी केल्या आहेत का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे़. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्यासाठी काय तरतूदी केल्या आहेत का हे देखील महत्वाचे ठरणार आहे़.
नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत तीन पोलीस उपायुक्तांसह ४० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये जमावाने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला. रक्तबंबाळ झालेल्या कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज 18 मार्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलद्वारे पोलीस उपायुक्त कदम यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट पोलिस उपायुक्त कदम यांच्यासोबतचा व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, फडणवीस यांनी लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास महाल परिसरात दोन गटांमध्ये औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून तणाव निर्माण झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि जमावाने दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवत जाळपोळ सुरू केली.
यावेळी जमावाने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार केला. तर जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेत डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी ३३०० सर्व्हे क्रमांकातील सुमारे २ हजार ८३२ हेक्टर जमीन राखीव केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केल्याने पुरंदर विमानतळ खासगीकरणातूनच करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुरंदर विमानतळासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही. मात्र, पुरंदर विमानतळाच्या संदर्भातील निर्णय प्रकिया शासनाकडून सुरू केली आहे. या ठिकाणी जाण्याकरिता पुणे महानगर प्राधिकरणाच्या वतीने रस्तेदेखील सोडले आहेत. याचबरोबर पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभार वळण, इखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या गावांतील जमिनीचे सर्व्हे क्रमांक त्याच्या क्षेत्रफळासह औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
शासनाच्या वतीने निधीची तरतूद नसतानादेखील पुरंदर विमानतळाचा प्रकल्प आता सुरू केला आहे. पुरंदर विमानतळ खासगीकरणातूनच उभे करण्यासाठी यापूर्वी चाचपणी केली होती. विमानतळाशेजारी उद्योग व्यवसाय उभे करून यातूनच मोठ्या प्रमाणात खर्चाचे संकलन करण्याचे नियोजन सुरू केले आहे. विमानतळासाठी पूर्वी निश्चित केलेल्या गावांना आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा दिला असून, त्यामध्ये रस्ते, पाणंद, ओढा यासाठी काही जागा संपादित केली जाणार आहे. या सर्व सात गावांच्या चतुःसीमा निश्चित केल्या आहेत. त्या लाल रंगाच्या रेषेने दाखवण्यात आल्याचे अधिसूचनेमध्ये सांगण्यात आलेले आहे
पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला शासनाने हिरवा कंदील दिला आहे.
याकरिता शासनाने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यापेक्षा अधिक मोबदला आम्हाला मिळणे अपेक्षित आहे. आमची शेती आम्ही या विमानतळाकरिता देत आहोत, तर याकरिता शासनानेदेखील शेतकऱ्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
– के. डी. गिरमे, शेतकरी, पुरंदर
Newsworldmarathi Pune : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबावर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झालं आहे. भारती पवार यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे पवार कुटुंबात शोककळा पसरली आहे.
भारती पवार या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या जवळपास दीड वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे.
भारती प्रतापराव पवार (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घआजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर २२ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.
सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.
Newsworldmarathi Pune : शिपाई, क्लार्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करावी, बँक व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, कर्मचार्यांशी केलेल्या करारांचे पालन व्हावे, ग्राहकांस चांगल्या व सुरक्षित सेवा द्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सोमवारी महाबॅंकेचे मुख्यालय ‘लोकमंगल’समोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर, संघटन सचिव शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते. ५१ झोनल ऑफिसमधील सुमारे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
याच मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे देशभरातील कर्मचारी २० मार्च रोजी एक दिवसाच्या देशव्यापी संपावर जात आहेत. हा संप प्रामुख्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आहे. बँकेने २०२१ साली सफाई कर्मचारी हे पदच रद्द केले. हे काम आऊटसोर्स केले. त्यांना किमान वेतनदेखील दिले जात नाही. कायमस्वरुपी कामगारांचे फायदे जसे की रजा, मेडिकल, सुट्टया कांहीच मिळत नाही. या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत.
बँकेत ७०० पेक्षा अधिक शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत. बँकेत ३१८ शाखा आहेत जेथे एकही क्लार्क नेमण्यात आला नाही. १२९० शाखा आहेत जेथे केवळ एक क्लार्क आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळ संपली, तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करून जावे लागते. सुट्टीच्या दिवशी कामावर यावे लागते. आजारपण असो की सांसारिक जबाबदाऱ्या यासाठी आवश्यकतेनुसार रजा मिळत नाही. काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे. कर्मचारी सतत ताण-तणावात काम करत आहेत. त्यामुळे सतत आजारी पडत आहेत. याचा ग्राहकसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढते आहे, त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. यासाठीच कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की, बँकेने त्वरित सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती करावी, जेणेकरून समाधानकारक ग्राहकसेवा देता येऊ शकेल.
याशिवाय कमी कर्मचाऱ्यात अधिक काम, यात बँकेचे नियम काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत. त्यातूनच फ्रॉडस होण्याची शक्यता निर्माण होते, नव्हे होत आहेत. यात बँकेचे तसेच ग्राहकांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? बॅंक यावर संवेदनशील नाही म्हणूनच २० मार्चला महाबँकेत संप अटळ बनला आहे.
याशिवाय बॅंक कर्मचारी संघटनांशी केलेले कायदेशीर करार, हायकोर्टाचे आदेश सगळेच धाब्यावर बसवून बँक व्यवस्थापन मनमानी करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे. महाबँकेच्या ग्राहकांनी आमची भूमिका समजून घ्यावी आणि आमच्या संपाला पाठिबा द्यावा, असे आवाहन कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी केले.
Newsworldmarathi Pune: विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी घेतला जाणार नाही याबाबत सरकारने आश्वासन दिले होते. मात्र हे सांगणाऱ्या सरकारने या निधीसाठी मागास आणि आदिवासी समाजाचा ७ हजार कोटींचा निधी वळता केला आहे. हे पूर्णपणे घटनाबाह्य असून मागासवर्गीय समाजाच्या हक्क आणि अधिकाराबाबत अन्यायकारक आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने लाडक्या बहिणीची निधी वाढवणार असल्याचे सांगितले होते. निवडून आल्यानंतर मात्र काही लाडक्या बहीणींच्या सवलती बंद केल्या आहेत. हे ही कमी की काय म्हणून सरकारतर्फे मागासवर्गीय समाजासाठी उपयोगात आणला जाणारा समाजकल्याण विभागाचा ३ हजार कोटी आणि आदिवासी समाजाचा हक्काचा ४ हजार कोटी असा एकूण ७ हजार कोटींचा निधी लाडक्या बहीणीकडे वळवला जात आहे.
मागासवर्गीय आणि आदिवासी विभागाचा निधी काढून लाडकी बहीण योजनेला देणे ही बाब केवळ या दोन समाजघटकांच्या अधिकारांवर गदा आणणारीच नाही तर ती संविधानविरोधी आहे. ही अर्थसंकल्पीय तरतूद राज्यघटनेनुसार केली जाते. ती अशी मनमानी पद्धतीने वळवता येत नाही. सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे या समाजघटकांच्या तोंडातील घास पळवण्याची कृती केली आहे.
मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या लोकसंख्येनुसार ही निधी अर्थसंकल्पात द्यावा लागतो. तो असा पळवता येत नाही. पण सरकारने याचा मुलाहिजा बाळगलेला नाही. त्याचवेळी सामाजिक न्याय विभागाचा निधी कमी करून तो लाडकी बहीण योजनेसाठी पळवताना या खात्याचे मंत्री संजय शिरसाठ यांना त्याबाबत माहितीही दिली गेलेली नाही. सामुदायिक जबाबदारी ही सरकारची जबाबदारी असताना सरकारचे हे बेजबाबदार वर्तन राज्यासाठी अतिशय गंभीर आहे.
सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा हा निधी सरकारने पुन्हा एकदा या विभागाला वर्ग करावा अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे. मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी सरकार आज पैसे देत नाही आणि हे पैसे अशा प्रकारे वेगवेगळ्या योजनांसाठी वापरले जात आहेत ही चिंतेची बाब आहे.