थंडीचे शहरात पुन्हा आगमन

0
Newsworld Pune : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे गायब झालेल्या थंडीचे शहरात पुन्हा आगमन झाले आहे. रविवारी सकाळी 19 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा नऊ अंशांपर्यंत घसरला असून, पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये शहरात किमान तापमान १०.८ अंशांपर्यंत घसरले होते. त्यानंतर झालेल्या पावसामुळे विचित्र वातावरण तयार होऊन थंडी गायब झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना थंडीची प्रतीक्षा होती. गेल्या काही दिवसांत किमान तापमानात घट सुरू होती. रविवारी तापमान 19 अंशांपर्यंत कमी झाले. रात्री उशिरा आणि पहाटेच्या गारठ्यात वाढ झाली आहे

प्रयेजा पुरम सोसायटीचे रहिवासी बिल्डर विरोधात रस्त्यावर

0
Newsworld Pune : सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स यांनी सोसायटी स्थापन होऊनही प्रत्येक फ्लॅट धारकाकडून देखभालीसाठी घेतलेली रक्कम सोसायटीला अनेक वेळा पाठपुरावा करूनही दिली नाही तसेच सहकारी संस्थेच्या हस्तांतरण केले नाही, सदनिकांची पूर्ण रकमा घेऊन देखील प्रकल्पातील कामे पूर्ण न करून विश्वासघात केला याच्या निषेधार्थ प्रयेजा पुरम येथील रहिवाशांनी शनिवारी सिंहगड रोड वरील प्रयेजा सिटी येथील बिल्डरच्या सेल्स ऑफिस समोर दिवसभर धरणे आंदोलन केले. तसेच सर्व रहिवाशांनी बिल्डरच्या सेल्स ऑफिसमध्ये रात्रभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून सर्व रहिवासी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत. या संदर्भात सोसायटीच्या वतीने पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे.मेसर्स भंडारी गेलडा असोसिएट यांच्यावतीने विजय बंडुलाल भंडारी व प्रयेजा डेव्हलपर्स तर्फे संदीप नारायण जानी यांनी हा प्रकल्प बांधलेला आहे. या प्रकल्पामध्ये 108 सदनिका व चार दुकाने आहेत.बिल्डरने प्रकल्पाच्या देखभालीसाठी काही सदनिका धारकांकडून दोन वर्षाचा तर काही सदनिका धारकांकडून तीन वर्षांच्या रकमा घेतलेल्या आहेत. सोसायटीची स्थापना होऊनही बिल्डर सहकारी संस्थेचे हस्तांतरण आणि महत्त्वाचे म्हणजे बिल्डरकडे देखभाल शुल्कापोटी सुमारे 28 लाखांची रक्कम अनेक वेळा पाठपुरावा करूनही सोसायटीला हस्तांतरित करत नाही याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. बिल्डर कडून ही रक्कम न मिळाल्यामुळे अनेक वेळा सोसायटीतील रहिवाशांना विजेचे बिल भरता न आल्याने मीटर काढून नेण्यात आले आहे तर लिफ्ट बंद पडल्यामुळे जेष्ठ नागरिकांना त्रास झाला आहे. त्यामुळे काही झाले तरी बिल्डर त्यांच्याकडे असलेली सोसायटीची रक्कम देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका प्रयेजा पुरम येथील रहिवाशांनी घेतली आहे.

इंटरॅक्ट क्लब अपटाऊनची मॉडर्न हायस्कूल मध्ये स्थापना.

0
Newsworld Pune : रोटरी क्लब अपटाऊनच्या वतीने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर येथील इयत्ता आठवी अ च्या वर्गात रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी डायरेक्टर युथ राजेंद्रकुमार सराफ, रोटरी क्लब अपटाऊनचे अध्यक्ष अरविंद मिठसागर, सचिव डॉ.राजेंद्र भारद्वाज, मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पर्यवेक्षक निवृत्ती गोपाळे, वर्गशिक्षिका ईशानी ढेरे आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून कु.आदित्य धुळधुळे याची निवड करण्यात आली. सचिवपदी कु.वेदांत बारगजे याची निवड करण्यात आली. या प्रसंगी बोलतांना राजेंद्रकुमार सराफ यांनी मुलांमध्ये समाजकार्य करण्याची प्रेरणा व सामुहीक नेतृत्वविकास यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. अरविंद मिठसागर यांनी या इंटरॅक्ट क्लबमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळेल असे सांगितले.

महानगर पालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Newsworld Pune : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांमुळे देशभरातील, विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका बराच काळ प्रलंबित होत्या. विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, पण आता या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत, त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू शकते. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे निवडणुका लवकरच पार पडतील. या निवडणुकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन प्रशासन मिळेल, ज्यामुळे स्थानिक पातळीवरील विकास योजनांना गती मिळेल.

अजित पवार यांना कोर्टाचा मोठा दिलासा

0
Newsworld Delhi : दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या निर्णयाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता मोकळी करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या निर्णयाचा लाभ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनाही झाला असून, त्यांच्या मालमत्तेसुद्धा मुक्त करण्यात आली आहे. हा निर्णय पवार कुटुंबासाठी मोठा न्यायालयीन दिलासा मानला जात आहे, कारण या प्रकरणामुळे गेल्या काही काळापासून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या निर्णयामुळे पवार कुटुंबाची मालमत्ता वापरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राजकीय व सामाजिक वर्तुळात याची चर्चा होत आहे.

डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाऊ : आ. अमित गोरखे

0
Newsworld Pune : महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील स्मारकावर मान्यवरांचा उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात दिलेल्या महान योगदानाची आठवण ठेवत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रसिद्ध व्याख्याते नामदेवराव जाधव, ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे, तसेच सुनील भिसे, सोपानराव चव्हाण, भीमराव पवार, विनायक मोहिते, धरम वाघमारे, संभाजी नाईकनवरे, निलेश कांबळे, विशाल कदम, शरद कोतकर, ज्ञानेश पाटील, सागर बहिरवाडे, अभिजीत देढे आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. या प्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा आग्रह व्यक्त करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करावे, असा संदेश देण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
Newaworld Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत दादा पाटील, संदीपजी खर्डीकर, महेश सकट, अतुल साळवे, रवींद्र खैरे, छगन बुलाखे, संदीप शेळके, दुर्गेश हातागळे, संदीप शेंडगे, अनिल भिसे, विकास घोलप, बाबू येरगुंटे, माधव साळुंखे आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेविका वर्षाताई भिमराव साठे, भाजपा अनु.जा मोर्चा अध्यक्ष भिमराव बबन साठे यांनी केले होते.

मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता : शरद पवार

0
Newsworld Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पवार यांनी पिचड यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोन बद्दल विचारले असता ते म्हणाले “मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता,” परंतु संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे ते शपथविधीसाठी उपस्थित राहू शकलो नाही.विरोधी पक्ष नेत्याबद्दल विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की, “राज्यातील विधानसभा त्याबाबत निर्णय घेईल, आम्ही काही सांगण्याची गरज नाही.”

डॉ. श्रीकांत परदेशी यांची मुख्यमंत्री सचिवपदी निवड

0
Newsworld Mumbai : IAS अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. परदेशी हे त्यांच्या पारदर्शक आणि प्रगतीशील कामकाजासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध पदांवर कार्य करताना लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने उल्लेखनीय योगदान दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदावर त्यांची नियुक्ती प्रशासनातील सुधारणा आणि निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडून लोकहिताचे निर्णय अधिक जलदगतीने आणि प्रभावीपणे घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.

ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली : अतुल लोंढे

0
Newsworld Mumbai : लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे.ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीने बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरु केले, त्या गावाला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रा. यशवंत भिंगे, सुर्यवंशी, पवार आदींचा समावेश होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरही उपस्थित होते. माकरडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की, मारकडवाडीची माती ही फक्त माती नाही तर भारतमाता असून गावकऱ्यांनी भारतमातेची सेवा केली आहे. महात्मा गांधींच्या चंपारण्य आंदोलनापेक्षा मारकडवाडीच्या आंदोलनाचे महत्व जराही कमी नाही. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीने खरा मार्ग दाखवला आहे. ईव्हीएम व सर्व सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मते चोरून लोकशाही संपवण्याचा प्रकार सुरु आहे त्याविरोधात मारकडवाडीने आंदोलन छेडले आहे. आता बॅलेटपेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असेही अतुल लोंढे यांनी आश्वस्त केले.