ढोले पाटील एज्युकेशनचे चेअरमन सागर ढोले पाटील होतायेत दिव्यांगांचा आधारवड

0
Newsworld Pune : 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचा उ‌द्देश दिव्यांग व्यक्तीच्या अधिकारांना प्रोत्साहन देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना समाजात सन्मानाने स्थान मिळवून देणे हा आहे. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील यांनी दिव्यांग कॅम्पच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करत समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ढोले पाटील परिवार सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुरुवातीपासून सक्रिय असून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी योगदान दिले आहे. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने आजवर चार मोठे दिव्यांग कॅम्प आयोजित केले असून त्यामधून हजारो दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळाला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून दिव्यांगांना मोफत अवयव पुरवले गेले आहेत. त्यांनी या व्यक्तींना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा ध्यास घेतला आहे. “शारीरिक अडथळे मनाला खचवू शकत नाहीत, कारण जिथे मनाची शक्ती असते तिथे अशक्य काहीच नसते,” हे सागर ढोले पाटील नेहमी सांगतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान प्राप्त झाला आहे. येणाऱ्या 16 डिसेंबर रोजी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, भारत विकास परिषद विकलांग केंद्र आणि अन्य सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पद्वारे 1,000 दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक सेवा देण्याचे उद‌दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दिव्यांग कॅम्पसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत है कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला आणखी बळ मिळणार असून, दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येकाने दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे ठरवले पाहिजे. त्यांना सहानुभूती नव्हे तर समानता आणि सन्मानाची गरज आहे. सागर ढोले पाटील यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेऊन आपण दिव्यांगांसाठी योगदान देऊ शकतो. इच्छाशक्ती आणि दया असल्यास आपण समाजातील प्रत्येक घटकाला उन्नतीसाठी हातभार लावू शकलो. या कार्याला पुढे नेण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प करूया.

भाजप खेळणार मुंडे कार्ड

Newsworld Mumbai : भारतीय जनता पार्टीच्या वतीने मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मुंडे कार्ड खेळले जाणार असल्याच्या चर्चेना उधाण आले आहे. महिला ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये निश्चितपणे वर्णी लागणार असल्याचे मानले जात आहे. मागील आठवड्यापासून पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्ये सातत्याने भेटी होत आहे आज रविवारी देखील पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या सातत्याने भेटी होत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.मागील निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक वेळा मुंडेंना डावलण्यात आले. एवढेच नव्हे तर समाजातून अन्य नेतृत्व उभारण्याचे देखील प्रयोग करण्यात आले. मात्र हे प्रयोग सर्व अयशस्वी ठरल्याने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंकजा मुंडे यांना डावलून केंद्रामध्ये डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली. मात्र तितकासा भाजपला फायदा होताना दिसला नाही. पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या खांद्यावरती भाजपने जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंकजा मुंडे यांना विधान परिषद देण्यात आली. त्या पाठोपाठ लगेच त्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे देखील सांगण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही मताने पराभूत झाल्यानंतर संपूर्णपणे मराठवाड्यातील ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. ओबीसी समाजाची असलेली वोट बँक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप यापुढे सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. त्याकरता पंकजा मुंडे यांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये निश्चित मानली जात आहे.

बावधान परिसरात मोठी आग

Newsworld Pune : पुण्यातील बावधन परिसरात एका खाजगी फोटो स्टुडिओला लागलेल्या आगीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्नीशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर प्रशासनाकडून परिसर सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सुदैवाने, आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिलदारपणा दाखवून विरोधी पक्षनेतेपद द्यावे : सुळे

0
Newsworld Pune : राज्यातील सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून विरोधी पक्षनेता पद द्यायला हवे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. १९८० साली काँग्रेस पक्षाने विरोधकांच्या कमी जागा असल्या, तरी दिलदारपणा दाखवून ‘लीड ऑफ अपोझिशन’ दाखविला होता. त्यामुळे आताच्या सरकारनेही मनाचा मोठेपणा दाखवून राज्यात विरोधी पक्षनेता पद द्यायला हवे. मात्र, यावर ते काय निर्णय घेतात हा त्यांचा प्रश्न असल्याचेही त्या म्हणाल्या मार्केटयार्ड येथील पक्ष कार्यालयात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या. नागरिकांकडून आमच्याकडे तक्रारी येत असतात. लोकांचा मतपत्रिकेवर विश्वास असेल, तशी त्यांची मागणी असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे. लोकशाही आहे ती लोकांसाठीच आहे. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्याला अर्थ नाही. ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घ्यायचा की नाही, यावर दोन दिवसांत निर्णय घेऊन पुढील पाऊल उचलले जाईल. की कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला, तर परीक्षा रद्द केली जाते. मग जनतेमध्ये ‘ईव्हीएम’बद्दल आक्षेप असतील, तर ते दूर करणे हे निवडणूक आयोगाचे कामच आहे. विधानसभा निवडणूक निकालाबाबत मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा आहे. नागरिकांकडून आमच्याकडे तक्रारी येत असतात. लोकांचा मतपत्रिकेवर विश्वास असेल, तशी त्यांची मागणी असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे.

महावीरची ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयर्नमॅन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

0
Newsworld Solapur : बार्शीचे महावीर कदम यांनी ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयर्न मॅन स्पर्धेत केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांनी बार्शी आणि भारताचा अभिमान वाढवला आहे. 226 किमीच्या या कठीण आव्हानाला यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास त्यांनी दाखवला आहे. 4 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे या आव्हानांचा सामना करत त्यांनी 13 तास 41 मिनिटांत ही कामगिरी पूर्ण केली. 3400 स्पर्धकांच्या उपस्थितीत कठीण हवामान आणि मार्गावर मात करून त्यांनी मिळवलेला हा विजय उल्लेखनीय आहे. महावीर कदम यांची ही कामगिरी केवळ बार्शीसाठी नव्हे तर भारतासाठीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशाबद्दल बार्शीत जल्लोषाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.त्यांच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे भविष्यात अधिक उंच शिखरे गाठण्याची प्रेरणा अनेकांना प्रेरणा मिळेल.

तुमचा न्यूयरचा ट्रिप प्लॅन आहे?

0
Newsworld Team : नवीन वर्षे आलेकी थंडीची (winter season) चाहूल लागते. पावसाळ्यानंतर येणारा थंडीचा ऋतू बहुतेकांना आवडतो. गुलाबी थंडीमध्ये विविध ठिकाणी भटकंती करण्याची मजा काही औरच असते नाही? साधारण डिसेंबरच्या शेवटी किंवा या काळात अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. नवीन वर्षाची नियोजित ट्रीप असते. सोनमर्ग (काश्मीर) – साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हलकी थंडी जाणवते. अशा परिस्थितीत, तुम्ही काश्मीरच्या निसर्गरम्य पर्वतरांगांना भेट देण्याचा विचार करू शकता. सोनमर्ग (Sonamarg) हे नवविवाहित जोडप्यांसाठी एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन (Honeymoon Destination) आहे. काश्मीरमधील पर्वतरांगा, बागा आणि विविध लहान-मोठी सरोवरं त्याच्या सौंदर्यात भर घालतात. काश्मीरमधला दल सरोवर (Dal Lake) जगप्रसिद्ध आहे. जर, तुम्ही जास्तचं नशीबवान असाल तर तुम्हाला या ठिकाणी हिमवर्षाव देखील अनुभवता येऊ शकतो. बीर बिलिंग (हिमाचल प्रदेश) – दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे लोक 4 ते 5 दिवसांत बीर बिलिंगला (Bir Billing) भेट देण्याचा प्लॅन करू शकतात. हिमाचल प्रदेशमध्ये असलेलं हे सुंदर ठिकाण पॅराग्लायडिंग, ट्रेक सारख्या साहसी क्रीडा प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय याठिकाणी मेडिटेशन (Meditation) देखील करता येते. येथील ठिकाणांमध्ये तुम्हाला तिबेटी संस्कृतीची झलक पहायला मिळेल. 10 हजार रुपयांच्या खर्चामध्ये ही मिनी ट्रिप करू शकता. मुक्तेश्वर (Mukteshwar) (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील मुक्तेश्वर (Mukteshwar) हे ठिकाण निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे जाऊन तुम्ही स्वच्छ आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. याशिवाय ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बाइकिंग, राफ्टिंगची देखील या ठिकाणी सुविधा आहे. तीर्थन व्हॅली (हिमाचल प्रदेश) – निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅली (Tirthan Valley) एक सर्वोत्तम पर्याय आहे. या ठिकाणी स्वर्गीय वातावरणाचा अनुभव घेता येतो. तीर्थन व्हॅली हिमालय राष्ट्रीय उद्यानापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ट्राउट माशांसाठी (Trout Fish) लोकप्रिय आहे. जवळपास 10 हजार रुपये खर्च करून तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता हृषीकेश (हरिद्वार) – धार्मिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हृषीकेश (Rishikesh) हे एक उत्तम ठिकाण आहे. गंगा घाट (Ganga Ghat) आणि कलात्मक मंदिरं हे याठिकाणचं प्रमुख आकर्षण आहेत. येथील मंदिरांमध्ये रात्री होणारी आरती पर्यटकांना आकर्षित करते. हृषीकेशपासून जवळ असलेल्या शिवपुरीलाही तुम्ही भेट देऊ शकता. तिथे राफ्टिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि बंजी जंपिंगचा आनंद घेता येतो. वाचा :  औली (उत्तराखंड) – औली (Auli) हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकणारी सोनेरी हिरवळ आपलं मन प्रसन्न करून टाकते. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. हनिमूनसाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचा मुक्तपणे आनंद घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि खर्च दोन्ही वाढवावे लागतील. रानीखेत (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये वसलेलं रानीखेत (Ranikhet) हे एक सुंदर हिल-स्टेशन आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडत असेल तर तुम्ही या नोव्हेंबरच्या सुट्ट्यांमध्ये रानीखेतला भेट देऊ शकता. याठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग, बाईक रायडिंग, राफ्टिंगचा देखील आनंद घेऊ शकता. रानीखेतमधील झुला देवी मंदिर (Jhula Devi Temple) देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही त्याला देखील भेट देऊ शकता.

उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये : बावनकुळे

0
Newsworld Mumbai : शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लागवला. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.ही माहिती ही बावनकुळे यांनी दिली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही. यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल.

पुण्याचे दादा कोण ?

0
Newsworld Pune : पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित दादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे नेमकी ही माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असताना, पुण्याचे पालकमंत्री नक्की कोण? असा संदिग्ध प्रश्न उभा राहिला आहे. चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असले, तरी सत्तांतरानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांबरोबरच जिल्ह्याचा कारभार हाती घेत या पदावर कब्जा केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच पाटील हे नाममात्र पालकमंत्री असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला असल्याने, पुण्यात प्रशासकीय आणि राजकीय वर्चस्व पुन्हा त्यांनी काबीज केले. त्यांच्याकडून आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना कामे व टेंडर देण्यात आली असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. याबाबत अनेकदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खटके उडाले. त्यामुळे मंत्रीपदाचा विस्तार होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते सतर्क झाले आहेत आणि पुण्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी करत आहेत. परंतु अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा दावा सोडतील का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि महायुतीपुढे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे आता पुण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं पुन्हा एकदा ‘इंटरेस्टींग’ होणार आहे.

फडणवीस यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही- खडसे

0
Newsworld Pune : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसेंचे ( Eknath Khadse ) सूर बदलले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही असं आता एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला. आपला प्रचंड छळ केला असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंनी ( Eknath Khadse ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांनी छळ केला म्हणून मी पक्ष सोडला असाही आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. बहुमत, जनमत त्यांच्या बाजूला आहे. फडणवीस हे निवडून आले हे मान्यच करावं लागणार आहे. व्यक्तिगत मतभेद, टीका वगैरे असू शकते. त्याला फार महत्त्व न देता लोक ज्यांना निवडून देतात त्यांच्या बाजूला बहुमत असतं हे तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे. आमचा पराभव झाला आहे, त्याची कारणं असू शकतात. पुढे काय घडेल? ते काळ ठरवेल. पण विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडणं ही माझ्यावरची जबाबदारी आहे.

आरपीआयला एक मंत्रीपद मिळेल अशी आशा

Newsworld Mumbai : कॉंग्रेसने संविधान बदलणार असा खोटा नेरेटीव्ह सेट केला त्यामुळे लोकसभेत फटका बसला. परंतू विधानसभेत मतदाराचे गैरसमज दूर केले म्हणून महायुतीला इतके मोठे यश मिळाल्याचे आठवले यांनी सांगितले. आरपीआयला एक मंत्री मिळावे अशी मागणीही यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे. भाजपाला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यायचे नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यायचे असल्याने आपण शिंदे यांना केंद्रात यावे अशी विनंती केली होती. परंतू त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांना महाराष्ट्रातच राजकारण करायचे आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या  एकनाथ शिंदे यांचा योग्य आदर महायुतीत राखला जाणार आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले.