भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम : केतकर

0
Newsworld Pune : “राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लाडकी बहिण योजनेसह हिंदू विरुद्ध मुस्लिम असा अपप्रचार भाजपकडून केला गेला. धार्मिक द्वेष करत मतांचे ध्रुवीकरण झाल्याने निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार वाढून जातीय व धार्मिक विद्वेष वाढला आहे. अशावेळी देशाचे राजकीय आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आव्हान आहे. आगामी काळात समाजातील सर्व घटक एकत्रित आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसची असून, भारतीयत्वाची भावना जपण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांनी केले. अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’ या कार्यक्रमावेळी डॉ. कुमार केतकर बोलत होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्त्या ऍड. रमा सरोदे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्ते मिलिंद अहिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ गांधी-आंबेडकर अभ्यासक अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन जोशी होते. संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, कार्यक्रमाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, माजी नगरसेविका लताताई राजगुरू, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ आमराळे यांच्यासह चंद्रशेखर कपोते, अनिल सोंडकर, ऍड. शाबीर खान, सुरेश कांबळे, अयुब पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. कुमार केतकर म्हणाले, “संविधान निर्मितीसाठी घटना समिती नेमली गेली, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. स्वातंत्र्य मिळताना धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे समितीवर दबाव होता की, देश केवळ हिंदुस्थान का होऊ शकत नाही. कारण, मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार होऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तेव्हाच घटनेने हिंदुस्तान असे जाहीर केले असते, तर आजचा देश निर्माण झाला नसता. संविधानमुळे आज देश टिकलेला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्य, काश्मीर, गोवा, पंजाब, पाँडिचेरी हे देशापासून तेव्हाच धर्माआधारे तुटले असते. ब्रिटिशांनी एकसंध भारत जिंकला नव्हता, तर आपल्या अनेक संस्थानिकांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. मात्र, तत्कालीन नेत्यांच्या धोरणात्मक कार्यामुळे भारत एकसंध झाला. “फाळणीनंतर हिंसा होऊनही देश टिकला. पण आज मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष वाढला आहे. सेक्युलर लोकांना भाजपने लक्ष्य केले. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करून काँग्रेसवर टीका केली जाते. फाळणी, स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी हत्या घटना घडल्यावर घटना समिती बैठक झाली त्यास पंडित नेहरू यांचे मार्गदर्शन होते. महात्मा गांधी यांनीच देशाचे पंतप्रधान पदासाठी नेहरू यांचे नाव सुचवले. भारताचे न झालेले पाहिले पंतप्रधान म्हणून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभारला आहे. हिंदू राष्ट्र निर्मिती स्वप्नासाठी भाजपने सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द यांना विरोध केला. पण सर्वोच्च न्यायलयाने त्यांना फटकारले आहे. इंदिरा गांधी यांनी देशातील अशांततेची परिस्थिती खंबीरपणे सांभाळली,” असेही केतकर यांनी नमूद केले. जेष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले, “देशाच्या घटनात्मक संस्था खिळखिळ्या होत आहे. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. आंबेडकर यांनी संविधान सादर करत देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यात समानता आणण्याचा प्रयत्न केला. संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून, त्याचे अनुकरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. आंबेडकर यांनी खूप तपश्चर्या केली. संविधानाप्रमाणे सरकार किंवा सत्तारूढ पक्ष आज वागत नाही, ही चिंताजनक बाब आहे. गांधी, नेहरू आणि आंबेडकर या त्रिमुर्तीमुळे देशाला संविधान मिळाले. पण त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काहीजण करत आहेत.” प्रास्ताविक करताना मोहन जोशी म्हणाले, “सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे २० वे वर्ष आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सन २००४ मध्ये देशाचे सर्वोच्च असे पंतप्रधान पद नाकारून त्यांनी त्याग करत पक्ष आणि देशसेवा केली. त्यांच्या त्यागाची प्रेरणा पुढील पिढीस मिळावी, यासाठी हा सप्ताह दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात काँग्रेस पक्षाने संविधान जागृत ठेवण्याचे काम केले आहे. राहुल गांधी यांनी यासाठी भारत जोडो यात्रा देशात काढली.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले. प्रवीण करपे यांनी आभार मानले.

माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

0
Newsworld Pune : ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पिचड यांना दोन महिन्यांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावत गेल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड हे महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री राहिले असून त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि राज्याच्या राजकारणात त्यांना एक अभ्यासू, समर्पित, आणि दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जायचे. पिचड यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय जीवनात अकोले विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा यशस्वी नेतृत्व केले. मधुकर पिचड हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आदिवासी विकास, शिक्षण, आणि ग्रामीण प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यामुळे ते राज्यातील जनतेच्या हृदयात आपले स्थान निर्माण करू शकले. मधुकर पिचड यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या कार्याची आठवण जनतेच्या मनात कायम राहील. राजकीय, सामाजिक, आणि आदिवासी क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य राहील.

काकूने केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

0
Newsworld Nagpur : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “देवेंद्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्याचं महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचं व्हिजन खूप मोठं आहे. त्याने मागील कार्यकाळात सुरू केलेल्या योजना आणि धोरणं पूर्ण करत तो राज्याचं नाव उंचावेल, याची मला खात्री आहे,” असं त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस याचं व्हिजन महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस योजना राबविण्यावर त्यांचा भर असेल. पुढील पाच वर्षांत राज्याच्या प्रगतीसाठी त्यांची धडपड सुरू राहील. असं ही त्या म्हणाल्या. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवा गतीशील टप्पा गाठण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेताना महाराष्ट्राच्या भविष्याला आकार देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व आणि राजकीय धडाडीचं कौतुक केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या संवादाचा आणि अनुभवाचा उल्लेख करत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही दोघंही विधानसभेत एकाचवेळी होतो, त्यामुळे आमचं भेटणं, बोलणं रोजच व्हायचं. एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर आम्ही नेहमी संवाद साधत असू. देवेंद्र हा राजकारणामध्ये लोकांच्या भावना आणि परिस्थिती अचूक ओळखतो, त्यात त्याला कोणी टक्कर देऊ शकत नाही,” असं त्यांनी सांगितलं. राजकारणात टिकण्यासाठी धडाडी आणि आवड महत्त्वाची असते, ती गुणवैशिष्ट्यं देवेंद्रमध्ये आहेत. कोणत्याही परिस्थितीत शांत राहून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ते नेहमी समस्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतात, ज्यामुळे ते जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करतात. शोभा फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचा आणि नेतृत्वाच्या वैशिष्ट्यांचा गौरव करत भरभरून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

जुन्नरच्या हापूसला मिळाली वेगळी ओळख

0
Newsworld Pune : जुन्नरमधील हापूस आंब्याला अखेर “शिवनेरी हापूस मँगो” या नावाने नवी ओळख मिळाली असून, त्याला जीआय (जिऑग्राफिकल इंडिकेशन) मानांकन प्रदान करण्यात आलं आहे. या ऐतिहासिक यशासाठी गेल्या दहा वर्षांपासून नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अथक प्रयत्न केले. या मानांकनासाठी ११५ वर्षांपूर्वीच्या हापूस आंब्याच्या झाडांची नोंद घेण्यात आली. शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून या आंब्याच्या वैशिष्ट्यांची सिद्धता करण्यात आली. कोकणात देखील हापूस आंब्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. त्यामुळे जुन्नरमधील हापूसला वेगळी ओळख मिळवून देण्याचा संघर्ष सुरू होता. “हापूस” या नावावरून वाद असल्याने जुन्नरमधील हापूस आंबा विशेषत्वाने ओळखला जात नव्हता. “शिवनेरी हापूस मँगो”ची ओळख: – जुन्नर परिसरातील हवामान, माती आणि विशिष्ट पद्धतीने घेतलेली काळजी या आंब्याला वेगळं स्थान देतात. “शिवनेरी हापूस मँगो” नावाने जुन्नरच्या हापूस आंब्याला आता आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशामुळे जुन्नरमधील शेतकरी आणि आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यामुळे **हापूस आंब्याच्या स्थानिक बाजारपेठेला तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी संधी मिळणार आहे. जुन्नरच्या आंब्याला “शिवनेरी हापूस मँगो” या नव्या ओळखीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रतिष्ठा मिळेल.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव ‘रुखवत’ 13 डिसेंबरला होणार प्रदर्शित

Newsworld Pune : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या माध्यमातून नव्याने प्रगल्भ आणि प्रदर्शित केले जात आहे. महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिकचे महत्त्व रुखवत या चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडले असून हा चित्रपट येत्या 13 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘रुखवत’च्या मोशन पोस्टर मध्ये वधू-वराच्या वेशात सुंदर नटलेली बाहुला -बाहुली, मंगळसूत्र आणि हळदी-कुंकू लग्नसरायच्या धावपळीत लोकांचं लक्ष वेधून घेतेय. पोस्टर मध्ये खास आकर्षण असलेल्या संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरच्या जळत्या फोटोमुळे या चित्रपटाच्या कथेची गोडी आणि गांभीर्यता स्पष्टपणे दिसून येत आहे. रुखवत मध्ये दोन प्रेमवेड्यांची कहाणी अनोख्या पद्धतीने मांडली आहे.जी लाकांना नक्कीच पसंतीस उतरेल. संतोष जुवेकर, प्रियदर्शिनी इंदलकर,अशोक समर्थ,अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे ‘रुखवत’ या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे. रुखवत मध्ये त्यांनी सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण साकारले आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवाल द्वारे केला आहे.

झुकेगा नही साला… पुष्पा 2 वादाच्या भोंवऱ्यात

Newsworld Mumbai मुंबईतील एका चित्रपटगृहात पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगदरम्यान मोठा गोंधळ उडाला. इंटर्वलनंतर अचानक गोंधळ सुरू झाला. यामुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आणि अनेकांना खोकला, घशाचा त्रास आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. हा प्रकार घडल्यानंतर थिएटरमध्ये गोंधळ उडाला, आणि लोक थिएटरच्या बाहेर धावू लागले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे प्रेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित “पुष्पा 2” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवत एकच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याने अडव्हान्स बुकिंगने थिएटर हाऊसफुल्ल होत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर वाद आणि अप्रिय घटना घडत असल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान हैदराबादमधील एका थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा जखमी झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेनंतरही वाद थांबत नसून, मुंबईतील एका थिएटरमध्येही पुष्पा 2″च्या प्रदर्शनादरम्यान गोंधळ उडाला. शो सुरू असताना, इंटर्वलनंतर सुमारे 20 मिनिटांसाठी चित्रपट थांबवावा लागला.प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, थिएटरमध्ये एक अज्ञात व्यक्तीने पेपर किंवा केमिकल फवारलं ज्यामुळे अनेक प्रेक्षकांना खोकला, घशाचा त्रास, आणि उलट्यांचा त्रासहोऊ लागला. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रकृती बिघडल्याने **शो तत्काळ थांबवावा लागला. सुमारे 20 मिनिटांसाठी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आले. या घटनेनंतर थिएटर प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि प्रेक्षकांना सुरक्षितरीत्या बाहेर नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. थिएटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, फवारणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये थिएटरमधील प्रेक्षक गोंधळलेल्या आणि त्रस्त अवस्थेत दिसत आहेत. काही प्रेक्षकांनी थिएटरमधील आतल्या दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे या घटनेची व्यापक चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे थिएटरमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजनांची आवश्यकता आहे. “पुष्पा 2” च्या लोकप्रियतेमुळे थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. “पुष्पा 2” च्या प्रचंड लोकप्रियतेसह अशा अप्रिय घटनांमुळे वाद वाढत असून प्रेक्षकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने चित्रपटगृहांमध्ये विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

Newsworld Mumbai : राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी (दि. 5) शपथ घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. दरम्यान, नुकतेच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाली बनेल, ही सदिच्छा व्यक्त करतो. शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील, ही अपेक्षा. उज्ज्वल महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा. हर्षवर्धन पाटील यांची ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे, विशेषतः त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर. त्यांच्या या भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने पाटील यांना पक्षात मानाचं स्थान दिले. अशा पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पाटील यांच्या निर्णयावर राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल

0
Newsworld Pune : पुणे-सोलापूर रोडवर पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार पासून रोजी रात्री 8 वाजता काम सुरु करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार असून पहिला टप्पाbपुणेकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर खोदकाम होणार आहे तर दुसरा टप्पा सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या रोडवर खोदकाम करण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा उपयोग करून सहकार्य करावे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे हा बदल पुढीलप्रमाणे असेल: वाहतूक बदलाचे तपशील: 1. सोलापूरहून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक: – अर्जुन रोड, मम्मादेवी चौक मार्गे स्वारगेटकडे जाणार. यामध्ये कोणताही बदल नाही. 2. स्वारगेटहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक: – मम्मादेवी चौक सरळ जाण्यास बंदी. – वाहने डावीकडे वळून बिशप सर्कलमार्गे उजवीकडे वळून सोलापूर रोडला जातील. – सदर मार्ग वन वे करण्यात येणार आहे. 3. सोलापूरवरून मम्मादेवी चौकात येणारी वाहने: – सरळ मम्मादेवी गोळीबार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. 4. डॉ. कोयाजी रोडमार्गे येणारी वाहने: – हरप्रीत मंदिर चौकात उजवीकडे वळून खाणे मारुती चौक, पुलगेट बस डेपोमार्गे कोंढव्याला जातील. 5. सोलापूरहून येणारी वाहने (मम्मादेवी चौकात): – उजवीकडे वळण्यास बंदी. – ही वाहने गोळीबार चौकमार्गे सरळ जाऊन, उजवीकडे वळून कॅम्प मार्गे इच्छितस्थळी जातील.

‘या’ दिवशी लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार

0
Newsworld Pune : वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचाऱ्याला महत्त्व मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेने गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद असणार आहे. महापालिकेकडून आता यंदाही पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे ११ डिसेंबरला लक्ष्मी रस्ता सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद राहणार आहे. याठिकाणी नागरिकांसाठी करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हॅप्पी स्रीटचे खेळ आणि रस्ता सुरक्षाबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यासाठी हा रस्ता आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. वाहनविरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजवण्याचे काम पथ विभागातर्फे होणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापर्यंत खास सायकलीचे आयोजन करण्यात येत आहे. पीएमपीएल कडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे. युनायटेड वे मुंबईतर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेबाबत कार्यशाळा आयोजित केली आहे. एकांश ट्रस्टतर्फे अंध, अपंग नागरिक यांच्याबाबत संवेदनशीलता आणि सार्वत्रिक प्रवेश योग्यताविषयक कार्यशाळा आयोजित केली आहे. सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटतर्फे पादचारी दिनानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत काढलेले चित्रकला प्रदर्शन आयोजित केले आहे. परिसर संस्थेमार्फत सार्वजनिक वाहतूक आणि जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन आयोजित केले आहे. आयईडीटीपी संस्थेमार्फत संख्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन भरवले जाणार आहे. रंग कला अकादमीतर्फे पादचारी दिनानिमित्त भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थेमार्फत प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

काँग्रेस खासदारांचे दिल्लीत आंदोलन

0
Newsworld Delhi : काँग्रेसच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने दिल्लीतील संसद परिसरात आंदोलन केले आहे. या आंदोलनाद्वारे सरकारकडे शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. पीकविमा योजनेत सुधारणा: शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ त्वरित आणि न्याय्य स्वरूपात मिळावा. कर्जमाफी:शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने कर्जमाफीची अंमलबजावणी करावी. किंमतींवर हमी:शेतीमालाला हमीभाव लागू करून शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा. इंधन व खतांचे दर कमी करणे:इंधन आणि खते यांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर होणारा आर्थिक बोजा कमी करण्याची मागणी. काँग्रेस खासदारांनी संसद परिसरात निदर्शने करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले आहे. पक्षाने सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. शेतकऱ्यांच्या समस्या देशभरातील महत्त्वाचा विषय असल्याने या आंदोलनाला व्यापक राजकीय आणि सामाजिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. https://x.com/ANI/status/1864918581475184711?t=PaHr6iQEVuaqYrPNByqPKw&s=19