Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना फोन

देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना फोन

Newsworld Mumbai : महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisements

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आज होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोनवरून दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच इतर काही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments