Newsworld Team : भारतात कांद्याची शेती जवळपास सर्व राज्यांमध्ये होते. २०२३ – २४ मध्ये देशात एकूण २४२ लाख टन कांद्याचं उत्पादन झालं. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २० टक्के कमी आहे. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील ४३ टक्के कांद्याचं उत्पादन होतं, तर दुसऱ्या स्थानी कर्नाटक आणि तिसऱ्या स्थानी गुजरात आहे.
कांद्याचे प्रकार
1 गोड कांदा
2 पिवळा कांदा
3 लाल कांदा
4 पांढरा कांदा
5 शॅलोट्स
6 हिरवा कांदा
7 मोती कांदा
8 टॉरपीडो कांदा
9 बरमुडा कांदा
10 सिपोलिनी कांदा
11 स्पॅनिश कांदा
12 इजिप्त कांदा
13 रेडविंग कांदा
14 माउ कांदा
15 विडालिया कांदा
कांद्याचा राखीव साठा कुठे
राखीव साठ्यातील कांदा बाजारात का आणला जात नाही, हा प्रश्नच आहे. मुळात राखीव साठ्यासाठी केलेल्या खरेदीत मोठा गैरव्यवहार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून जास्तीत -जास्त ५० ते ५५ रुपये दराने व्यापारी कांदा खरेदी करतात, तो कांदा मुंबईत येईपर्यंत शंभर रुपये किलो कसा होतो. सरकारचे कांदा खरेदीवर नियंत्रण असते, मग कांदा विक्रीवर का नियंत्रण ठेवले जात नाही. सरकारच्या आशीर्वादाने दरवर्षी शेतकरी आणि ग्राहकांची लूट करून व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे केले जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे, असे मत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण:
गेल्या आठवड्यात लाल कांद्याला प्रति क्विंटल 4 हजार 300 रुपये भाव मिळाला होता. आज त्याचं कांद्याला सरासरी 3 हजार 500 रुपये भाव मिळाला आहे. कांदा दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाले असून लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोग लागत असतांना त्यावर महागडी औषधे मारावी लागत आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी दोन्ही बाजूने होरपळला जात आहे.
मागील आठवड्यात लाल कांदा भाव(प्रति क्विंटल)
कमीत कमी – 1500 रू
जास्तीत जास्त – 5500 रू
सरासरी – 4300 रू
आजचे लाल कांदा भाव.. कमीत कमी – 1000 रू जास्तीत जास्त – 5101रू सरासरी – 3500 रू
फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढली:
चक्रीवादळामुळे पावसाची भिती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आणला आहे. दरम्यान, कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. सर्वसाधारण कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार ते तीन हजार रुपये भाव मिळतो आहे. तर उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. दुसरीकडे, तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास 850 ट्रक कांद्याची आवक झाली आहे.
काय भाव मिळाला?
सोमवारी लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2600 रुपये, बारामती बाजारात 5000 रुपये, येवला बाजारात 2900 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 3800 रुपये तर देवळा बाजारात 3500 रुपये दर मिळाला. कांदा दरात सुधारणा होण्या ऐवजी घसरण सुरु झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परिणामी, लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी ५८७ गाड्यांतून आला मार्केट यार्डात कांदा आला. ३०० गाडया भरून कांदा आवक सरासरी गेल्या आठवडपात होती. शेतकऱ्यांना १००० हजार ते ५००० हजार रुपये मिळाले. जुन्या कांद्याला साधारण ५००० हजार रुपये भाव मिळाला होता. सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणात सोलापुरात आला आहे. आगामी काही दिवसात अजून कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे.
यामुळे कांदा दरवाढ
१) दिवाळीनिमित्त नाशिकमध्ये कांदा – विक्री आठवडाभर बंद होती
२) गेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम संपल्यामुळे आवक घटली
३) काढणीला आलेला खरीप कांदा परतीच्या, बिगरमोसमी पावसामुळे सडला
४) खरीप कांद्याच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट
नाशिक येथील शेतकरी रोहित पाटील यांनी दीड एकरमध्ये कांद्याची लागवड केली होती. नोव्हेंबरमध्ये ते काढणीवर आले असते. तत्पुर्वीच पावसात रोपे वाकडेतिकडे होऊन गेले. साधारण परिस्थितीत ५० ते ६० क्विंटलचे उत्पादन झाले असते. आता १० ते २० क्विंटल कांदे निघाले आणि दर असेच राहिले तरच लागवडीसाठी केलेला ४० हजार रुपयांचा खर्च भरून निघू शकेल, असे ते सांगतात. पावसाने केवळ पिकाचे नुकसान झाले नाही तर, उन्हाळ कांद्याची रोपे खराब केली. ६४२ हेक्टरवरील कांदा रोपवाटीकेचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करून रोपे तयारी करावी लागतील. पुढील उन्हाळ कांद्याच्या लागवडीला उशीर होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.