विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव… ‘झेप’ उपक्रमाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात संपन्न
Newsworldmarathi Pune: पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, संचलित ‘सन्मती बाल निकेतन”, मांजरी (बु.), पुणे येथे ‘झेप’ (वर्ष ३ रे ) उपक्रमाचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जसविंदर नारंग सर यांची समारोप समारंभात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षीय स्वरूपात विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासमवेत द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे रोहित शिंदे आणि विजय कोल्हटकर, ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक गायकवाड, तसेच द मदर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष विनय सपकाळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माईच्या कन्या व संस्थेच्या अध्यक्षा मा. ममता सिंधुताई सपकाळ यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी ‘झेप’ उपक्रमाच्या उद्देशांवर प्रकाश टाकत सांगितले की, “ही केवळ उपक्रमाची सांगता नसून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचा आणि प्रगतीचा एक टप्पा आहे.
नारंग सर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “अनाथ मुलांना ते अनाथ असल्याची जाणीव न होऊ देता, त्यांना कुटुंबवत प्रेम, योग्य शिक्षण आणि सुविधा देणे हेच आदरणीय माई आणि आदरणीय आदर पूनावाला सर यांचे ध्येय आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी ही संस्था जवळून पाहत असून तिचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे”
मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, विविध भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, या प्रसंगी नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी यंदा पासून दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी रु. ५०००/- ची शिष्यवृत्ती सुरू केली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश शेटे, पाहुण्यांचा परिचय प्रताप चिंचोले, तर आभार प्रदर्शन पद्मा शिंदे यांनी केले.
‘झेप’ उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, आणि कलेच्या विविध अंगाचा विकास साधत त्यांच्यातील सुप्त गुणांना नवी दिशा दिली आहे. हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, याची खात्री आहे.
व्हिसाचा आनंद अन् २ मिनिटांत काळरात्र ! डॉक्टर दाम्पत्यासह ३ मुलांचा मृत्यू , मन सुन्न करणाऱ्या करून कहाण्या समोर
Newsworldmarathi Gujrat: Dr. Pratik Joshi Family Death | अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे, ज्याने सर्वांचे मन हेलावून टाकले. राजस्थानच्या बांसवाडा येथील डॉ. प्रतीक जोशी, त्यांच्या पत्नी डॉ. कोनी व्यास आणि तीन मुलं प्रद्युत, मिराया आणि नकुल लंडनला नव्या आयुष्याच्या स्वप्नांसह निघाले होते. पण नियतीने त्यांचे सर्व स्वप्न अवघ्या दोन मिनिटांत उद्ध्वस्त केले.
डॉ. प्रतीक २०१६ पासून लंडनमध्ये स्थायिक होते, तर डॉ. कोनी उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी कोनी यांनी नुकताच नोकरीचा राजीनामा दिला होता.
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर व्हिसा मिळाल्याचा आनंद साजरा करत, गुरुवारी (१२ जून) ते एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 मधून लंडनला निघाले. विमानात बसताच त्यांनी उत्साहाने काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला, ज्यामध्ये नव्या सुरुवातीचा आनंद झळकत होता.
मात्र, टेकऑफनंतर काही क्षणांतच विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले. प्रचंड आगीच्या ज्वाळांमध्ये २४२ प्रवाशांपैकी २४० जणांचा मृत्यू झाला, यात डॉ. प्रतीक, डॉ. कोनी आणि त्यांच्या तीन निष्पाप मुलांचाही समावेश होता.
केवळ एक प्रवासी वाचला. हा सेल्फी आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बांसवाडा आणि उदयपूरमधील त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना घडल्याचे कोणालाही विश्वास बसत नाही, आणि हे कुटुंब आता फक्त स्मृतींमध्ये उरले आहे.
शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’
Newsworldmarathi Pune: मनमोहक कथक नृत्य, वैविध्यपूर्ण व मधुर गायकी, राग व बंदिशींचे भाव अन ठुमरीने झालेली सांगता अशा शास्त्रीय संगीत, नृत्य व गायनाने सजलेल्या ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’मध्ये युवा कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वरनिनाद पुणे संस्थेच्या वतीने दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे नुकतेच आयोजन केले होते. युवा पिढीतील प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव आहे. या महोत्सवाला राहुल देशपांडे, अमोल निसळ, तेजस उपाध्ये, राजस उपाध्ये, रईस खान, अंजली दाते, गायत्री जोशी, धनंजय गोखले आणि मेहेर परळीकर यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थित राहून युवा कलाकारांना प्रोत्साहन केले. वृषाली निसळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पहिल्या दिवशी पंडिता शमा भाटे यांच्या शिष्या ईशा नानलच्या कथक नृत्याने महोत्सवाची सुरुवात झाली. ईशाने ‘वंदना’, ‘चौताल’ (तोडे, तुकडे, तत्कार) आणि ‘अभिनय पक्षात’ ‘एक और एकलव्य’ या कलाकृती सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नृत्यातून कथक परंपरेची शुद्धता आणि अभिनयाची खोली दिसून आली. पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य अनुभव खमारूने यमन रागामध्ये विलंबित एकतालात ‘सुमरन तोरा’ ही बंदिश, ‘झपताल’मध्ये ‘चंद्रमा ललाट पर’ आणि ‘द्रुत एकताल’मध्ये ‘गुन नाही एको’ सादर केले. ‘द्रुत तीन ताला’मध्ये तराणा आणि ‘पिलू रागा’मध्ये ‘पिया के बोल ना बोल’ ही ठुमरी सादर केली. तबल्यावर यशद गायकी, हार्मोनियमवर अभिनय रवंदे यांनी साथ दिली. एस. आकाश यांच्या प्रभावी गायनाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. रागेश्रीमध्ये आलाप, ‘झपतालात’ गत आणि ‘तीन ताला’मधील द्रुत गत सादर केली. त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी यांनी साथ दिली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अथर्व वैरागकर यांच्या मधुर गायनाने झाली. गुरु ओंकार वैरागकर आणि गायत्री जोशी यांचे शिष्य असलेल्या अथर्वने ‘राग मधुवंती’मध्ये ‘विलंबित एकताल’मध्ये ‘कोयलिया बोले डाल’ आणि ‘द्रुत बंदिश’ ‘काहे छेडत बलिहारी’ सादर केली. तसेच त्यांनी ‘पहाडी रागा’मध्ये ठुमरी सादर करत आपल्या गायन कौशल्याची झलक दाखवली. त्यांना कार्तिकस्वामी आणि माधव लिमये यांनी साथ दिली. तेजस उपाध्ये यांचे शिष्य अमन वरखेडकरने ‘रागेश्री’मध्ये आलाप, जोड आणि झाला सादर केले. तसेच त्यांनी ‘रूपक ताल’ आणि ‘तीन ताला’मध्ये गत सादर करत रसिकांची दाद मिळवली. त्यांना कार्तिक स्वामी यांनी तबल्यावर साथ दिली.
‘स्वरनिनाद’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक गायनाने दुसऱ्या दिवसात रंगत आणली. त्यांनी ‘खमाज थाटा’तील सरगम गीत सादर केले. ज्यात तिलककामोद ,देस, जयजयवंती, झिंझोटी, कलावती या रागांच्या छटा होत्या. त्यानंतर ‘कल्याण रागा’त तिल्लाना सादर करत त्यांनी उपस्थितांना आनंदित केले. तबल्यावर यशद गायकी, हार्मोनियमवर निषाद जोशी आणि व्हायोलिनवर आशिष बेहरे यांनी साथ दिली. महोत्सवाची सांगता शरयू दातेच्या प्रभावी शास्त्रीय गायनाने झाली. अश्विनी भिडे यांच्या शिष्या असलेल्या शरयूने ‘राग नंद’मध्ये ‘विलंबित एकताल’मध्ये ‘ढूंडु बन सैंया’ ही बंदिश आणि ‘द्रुत तीन ताला’तील ‘मोहे करून दे बिया’ ही बंदिश सादर केली. तसेच त्यांनी साडेसात मात्राच्या तालामध्ये ‘राग प्रतीक्षा’ सादर करत मैफिलीला उंचीवर नेले. त्यांना आशय कुलकर्णी आणि माधव लिमये यांनी साथ दिली.
पहिल्यांदा लंडनला मुलाच्या भेटीला निघालेले आई-वडील विमान अपघातात मृत्यू…
Newsworldmarathi Gujrat: गुजराथ अहमदाबाद शहरांमध्ये आज दुपारी विमान अपघात झाला. या विमान अपघातात प्राथमिक माहितीनुसार 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या विमान अपघातामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. महादेव तुकाराम पवार आणि आशा महादेव पवार अशी या विमानात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत. हे दाम्पत्य सांगोला तालुक्यातील हतीद या मूळ गावातील आहे. मात्र ते कामानिमित्त गुजरातमध्ये नडीयाद इथं राहत होतं. विमान अपघातात या दोघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे..
अपघातात आपले चुलते दगावल्याने पवार यांचे पुतणे सचिन पवार, पुतणी उषा चव्हाण व त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या मूळ गावाहून पुण्याकडे जात असताना ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे थांबले होते.. ते पुण्याहुन गुजरातच्या अहमदाबाद येथे निघाले आहेत.
मयत महादेव पवार व आशाबाई पवार यांचे पुतणे सचिन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की.,
गेली सात-आठ वर्षांपासून त्यांचा चुलत भाऊ म्हणजे मयत महादेव पवार व आशाबाई पवार यांचा मुलगा शैलेश हा लंडनमध्ये बेकरी व्यवसाय करीत आहे.,
आपल्या मुलाला भेटण्यासाठी ते दोघे पहिल्यांदाच परदेशात प्रवास करत होते. त्यांच्या मुलाने लंडनमध्ये एक बेकरी सुरू केली असून गेल्या सात आठ वर्षांपासून तो तिथेच वास्तव्य करत आहे.
अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना टाटा समूहाकडून १ कोटीची मदत
Newsworldmarathi Gujrat : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फाइट AI‑171 च्या भयंकर अपघातानंतर, टाटा समूहाने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा खर्च या समूहाकडून निघणार आहे. तसेच बी.जे. मेडिकल कॉलेजचं वसतीगृह, पुन्हा बांधून देण्यात येणार आहे. असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.
एअर इंडियानेही प्रवाशांसाठी सहानुभूती दर्शवत 12–14 जून दरम्यान ट्रॅव्हल तारखांमध्ये फीशुल्क बदल किंवा रद्दीकरणाची परवानगी जाहीर केली आहे.
या दुर्घटनेत 242 प्रवासी-क्रूमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगिज व 1 कॅनडियन नागरिक होते. विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि महाराष्ट्रातील तीन नागरिक अपर्णा महाडिक, दीपक पाठक, मैथिली पाटील यांचा समावेश आहे. एका ब्रिटिश-भारतीय प्रवाशाचे चमत्काराने वाचल्याचे नोंदवले गेले आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी अपघातातील निष्पत्ती अंतरराष्ट्रीय नियमांनुसार विमान अपघात अन्वेषण विभागाकडून केली जाईल, अशी माहिती दिली. तसेच, केंद्रीय मंत्रालयात संभाव्य समन्वयासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, आपत्कालीन काळजी आणि संपर्कासाठी विविध हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत—079‑232‑51900, 9978405304, 011‑24610843 आणि 9650391859 .
टाटाकडून 1 कोटी प्रमाणे मृतांच्या कुटुंबांना मदत, उपचार खर्च व हॉस्टेल पुनर्निर्मितीसह व्यापक पॅकेज
Air India – ट्रॅव्हल रद्दीकरण/बदलावर मुक्तपणे परवानगी
265 लोकांचा दुःखद अंत (241 विमानातील + 24 जमिनीवरील नागरिक)
ब्लॅक बॉक्स तपास – विमानसेवा संघटना व आंतरराष्ट्रीय मंडळींच्या सहभागाने शक्य
केंद्र सरकार – एमजे नायडू – नियंत्रण कक्ष, समन्वय व चाचणी सुरळीत चालवण्याचं आश्वास
Sanjay Raut : सरकारला ना वेदना, ना पश्चात्ताप… मग यांना काय टाळता येतं?; संजय राऊतांच्या केंद्रावर हल्लाबोल
Newsworldmarathi Mumbai: शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी अहमदाबाद विमान अपघातावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. गुरुवार दुपारी टेकऑफ झाल्यावर काही सेकंदांतच कोसळलेला एअर इंडिया AI‑171 ने 265 जणांचा जीव घेतला. मृतांमध्ये 241 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स आणि 24 मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी यांचा समावेश आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, “एव्हिएशनमध्ये ‘ड्रीमलाइनर’सारखं अत्यंत सुरक्षित मानलं जाणारं विमान टेकऑफनंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि एक प्रवासी वगळता २४१ प्रवासी ठार होतात. इतक्या मोठ्या घटनांनंतरही तिथे वेदना, पश्चात्ताप, जबाबदारी कोठे आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारला.
ते पुढे म्हणाले, रेव्हलसे, पहलगामसारखे हल्ले, विमान अपघात… ‘असे मोठे अपघात टाळता येत नाही’ असा आपला दावा आहे; मग यांना काय टाळता येत नाही? संजय राऊतांनी एअर इंडियाचा खासगीकरण, ड्रीमलाइनर खरेदी, आणि दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद पडल्यासंबंधी तांत्रिक दोषांवरही स्पष्टीकरण देत म्हणाले, मग या घटनांची जबाबदारी कोण घेणार? चौकशी होणार; ब्लॅक बॉक्स आल्यावर सर्व उघड होईल; पण काम झाले नाही; प्रधानमंत्र्यांच्या घोषणांनंतरही जबाबदारी कुठे? असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल उपकरण आहे, जे उहाणादरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलटचे संभाषण रेकॉर्ड करते. ब्लॅक बॉक्स हा चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल.
ब्लैक बॉक्समध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) – विमानाचे वेग, उंची, दिशा, इंजिन माहिती रेकॉर्ड करतो आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) -पायलट व सह-पायलटचे संभाषण आणि केबिनमधील आवाज रेकॉर्ड करतो असे दोन मुख्य घटक असतात.
विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्त्व काय?
अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते. ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो? ब्लॅक बॉक्स टायटॅनियमसारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो. तो उच्च तापमान, पाण्याचा दाब, धक्के सहन करू शकतो. त्यामुळे तो अपघातानंतरही सुरक्षित राहतो.
संजय राऊत यांचे अपघाताच्या गंभीरतेवर लक्ष केंद्रित
सरकारकडून दुःख, पश्चात्ताप आणि जबाबदारीचे अभाव
ड्रीमलाइनर विमानाच्या तांत्रिक अडचणी व खरेदीच्या चौकशीची मागणी “अपघात टाळता येत नाही” असा सरकारचा धोरणात्मक दृष्टिकोन पुन्हा आणि पुन्हा सवालाखाली आणला आहे.
एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग
Newsworldmarathi Team : शुक्रवार (13 जून) थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व 156 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
अंदमान समुद्रावरून प्रदक्षिणा घालल्यानंतर विमान फुकेत विमानतळावर परत उतरले. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
माणुसकी ओशाळली…! विमान अपघातात रक्ताळलेल्या शीरासोबत बघ्यांनी सेल्फी काढली, हृदय पिळवटून टाकणारे दृश्य
Newsworldmarathi Gujrat: Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत विमान मेडिकल कॉलेज परिसरात कोसळले.
या भीषण दुर्घटनेत २६५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर विमानाने पेट घेतल्याने अनेक मृतदेह जळून खाक झाले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आणि विमानाचे तुकडे यामुळे घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पसरले होते.
मात्र, या दुर्दैवी घटनेनंतर काहींच्या अमानवी कृत्याने माणुसकीला काळिमा फासला. एका महिला प्रवाशाचे रक्ताळलेले शीर रस्त्यावर पडलेले असताना, काहींनी त्यासोबत सेल्फी काढली, तर काहींनी व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केले. या संतापजनक कृतीमुळे नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “माणुसकी कुठे गेली?” असा सवाल उपस्थित करत अनेकांनी या अमानुष वर्तनाचा निषेध केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विमानाचे तुकडे आणि पंखांचे अवशेष सर्वत्र पसरलेले दिसले. सध्या या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता; 62 हजार 125 मेगावॅट वीज निर्मिती होणार?
Newsworldmarathi Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या जलसंपदा विभागाच्या बैठकीत राज्यातील सिंचन आणि पंप‑स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. 381 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, या योजना राबवल्यास अंदाजे 30.68 लाख हेक्टर जमिनीवर सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत.
बैठकीत 45 पंप‑स्टोरेज (उदंचन) प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. या योजनेद्वारे राज्यात 62,125 मेगावॅट वीज निर्मिती होईल आणि एकूण 96,190 रोजगार निर्माण होण्याचे अंदाज आहेत. याशिवाय खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील 15 कंपन्यांसोबत ₹3.41 लाख कोटी किंमतीच्या 24 सामंजस्य करारांचा (MoU) प्रारंभ झाला आहे.
फडणवीस यांनी बैठकीत “सिंचन प्रकल्पांनी कृषी उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना जीवनमानात सुधारणा करावी अशी अपेक्षा आहे, तर पंप‑स्टोरेज प्रकल्पांनी पर्यावरणपूरक वीज निर्मितीत मदत होईल; कामं वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे” असे स्पष्टपणे सांगितले . राज्य शासनाने ओळखलेल्या मागील दोन वर्षांच्या काळात एकूण 185 नवीन सिंचन कामांना मान्यता दिली, ज्यातून 26.66 लाख हेक्टर सिंचनात आले असून, विशेष दुरुस्तीच्या 196 कामांमधून आणखी 4.02 लाख हेक्टरची नळी सुलभ होणार आहे.
हे निर्णय, करण्यात आलेले देय MoU आणि प्रशासकीय मान्यता यांच्या आधारे, महाराष्ट्रात कृषी, ऊर्जा व रोजगार या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एकाच वेळी सशक्त उभारणी केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिलेल्या स्पष्ट निर्देशांमुळे या मोठ्या योजनांचा वेळेत व प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
पुण्यात खुनी खेळ, बालसुधारगृहात टॉवेलच्या दोरीने गळा घोटण्याचा प्रयत्न; 5 जणांकडून निर्दयी हल्ला
Newsworldmarathi Pune: पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येरवड्यातील बालसुधारगृहात (बारक न. 2) एक भीषण घटना समोर आली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या पाच अल्पवयीनांनी एका 17 वर्षीय मुलाला बाथरूम साफ करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण केली आणि नंतर त्याचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याचा गळा आवळण्यासाठी टॉवेल फाडून तयार केलेली दोरी वापरली आणि बेदम मारहाण करून जमिनीवर दाबून ठेवले.
याबाबत संतोष किसन कुंभार (वय-४९, रा. चहोली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पाचही आरोपी मुलांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये १७ वयोगटाचे दोन, १६ वयोगटातील दोन आणि १४ वर्षाचे एक अशा पाचजणांचा समावेश आहे. सदरचा प्रकार हा पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग मध्ये बराक क्रमांक दोन मध्ये घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यांमधील अल्पवयीन आरोपींना येरवडातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवण्यात येते. या ठिकाणी बराक क्रमांक दोनमध्ये बाथरुम साफ करण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलाला पाच जणांनी बेदम मारहाण केली.नाहीत, तर त्यांनी पीडित मुलाला जमीनीवर पाडून त्याचा दोरीने गळा आवळण्याचा देखील प्रयत्न केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

