Newsworldmarathi Pune: पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येरवड्यातील बालसुधारगृहात (बारक न. 2) एक भीषण घटना समोर आली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या पाच अल्पवयीनांनी एका 17 वर्षीय मुलाला बाथरूम साफ करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण केली आणि नंतर त्याचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याचा गळा आवळण्यासाठी टॉवेल फाडून तयार केलेली दोरी वापरली आणि बेदम मारहाण करून जमिनीवर दाबून ठेवले.
याबाबत संतोष किसन कुंभार (वय-४९, रा. चहोली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पाचही आरोपी मुलांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये १७ वयोगटाचे दोन, १६ वयोगटातील दोन आणि १४ वर्षाचे एक अशा पाचजणांचा समावेश आहे. सदरचा प्रकार हा पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग मध्ये बराक क्रमांक दोन मध्ये घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यांमधील अल्पवयीन आरोपींना येरवडातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवण्यात येते. या ठिकाणी बराक क्रमांक दोनमध्ये बाथरुम साफ करण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलाला पाच जणांनी बेदम मारहाण केली.नाहीत, तर त्यांनी पीडित मुलाला जमीनीवर पाडून त्याचा दोरीने गळा आवळण्याचा देखील प्रयत्न केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


Recent Comments