Pune Indrayani Bridge : इंद्रायणीच्या कुंडमळा पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत काय काय घडलं? किती जण बेपत्ता? सविस्तर अपडेट एकाच क्लिकवर…

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली, ज्यामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्यासाठी नदीपात्रात उतरले आहे. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह तीव्र झाल्याने बचावकार्याला मोठे आव्हान आहे. कुंडमळा हे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील धबधबा आणि इंद्रायणी नदीच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. रविवारी, सुट्टीमुळे आणि पावसाळ्याच्या आकर्षणामुळे, या पुलावर सुमारे 100 ते 125 पर्यटक उपस्थित होते. हा पूल 30 वर्षांहून अधिक जुना असून, तो जीर्ण झाला होता. स्थानिक पोलिसांनी यापूर्वीच पुलावर “प्रवासासाठी अयोग्य” असा फलक लावला होता, तरीही पर्यटकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. पुलावर पर्यटकांबरोबरच काही दुचाकीही होत्या, ज्यामुळे पुलावर अतिरिक्त भार पडला. दुपारी 3:30 ते 4:00 च्या सुमारास हा पूल अचानक कोसळला, आणि त्यावरील अनेकजण इंद्रायणी नदीच्या तीव्र प्रवाहात पडले. काहींनी पोहून किनारा गाठला, तर काही प्रवाहात वाहून गेले. आत्तापर्यंत काय काय घडलं? कुंडमाला दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यापैकी दोघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 32 जण जखमी झाले असून, यापैकी आठ जण गंभीर अवस्थेत आहेत. गंभीर जखमींवर पवना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात 10 जणांवर उपचार झाले, त्यापैकी दोघे आयसीयूमध्ये होते, तर इतरांना किरकोळ जखमांमुळे घरी सोडण्यात आले आहे. अथर्व रुग्णालयात 17 जखमींवर उपचार झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत NDRF, स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी मिळून 51 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, 2 ते 3 जण अजूनही बेपत्ता असण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाकडे नेमकी माहिती उपलब्ध नाही, परंतु NDRF पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. बचावकार्य आणि आव्हाने NDRF चे प्रयत्न: रविवारी दुर्घटनेनंतर तातडीने NDRF च्या दोन तुकड्या, स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. रात्रीच्या वेळी पुलाचा लोखंडी सांगाडा नदीपात्रातून काढण्यात आला. सोमवारी सकाळी NDRF पुन्हा नदीपात्रात उतरून बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. पावसाचे आव्हान: मावळ तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळीही मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे इंद्रायणी नदीचा प्रवाह अधिक तीव्र झाला आहे. यामुळे बचावकार्याला मोठी अडचण येत आहे. नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि ढगाळ वातावरणामुळे शोधकार्य कठीण झाले आहे. तांत्रिक अडचणी: NDRF गॅस कटर आणि क्रेनचा वापर करून पुलाच्या अवशेषांखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. एक व्यक्ती अजूनही अवशेषांखाली अडकली असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेसंदर्भात तीव्र दुखः व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये नुकसानभरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले आहे. ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि तहसीलदार यांच्याशी सतत संपर्कात असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, पुलाच्या देखभालीसाठी जबाबदार कोण होते, याचा शोध घेतला जाईल. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यांनी प्राथमिक अंदाजानुसार पूल जीर्ण आणि गंजलेला असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी यांनी सांगितले की, दुर्घटना दुपारी 3:15 वाजता घडली आणि 3:30 वाजता माहिती मिळताच 250 जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर 30 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि नागरिकांना पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे ही दुर्घटना घडली आहे. एका जखमी पर्यटक निलेश कोलम यांनी सांगितले की, “पुलावर 200 हून अधिक लोकांची गर्दी होती. मधला भाग अचानक कोसळला आणि 50 हून अधिक लोक एकमेकांवर पडले. नदीचा प्रवाह इतका जोरदार होता की काहीजण वाहून गेले.” स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, पावसाळ्यात कुंडमळा परिसरात मोठी गर्दी होते आणि पूल हा सेल्फी पॉइंट म्हणून लोकप्रिय आहे. पुलाच्या जीर्ण अवस्थेचा प्रश्न हा पूल 100 वर्षांहून अधिक जुना असल्याचे काही स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले, तर काहींच्या मते तो 1992 मध्ये बांधला गेला. तसेच चार वर्षांपूर्वीच यावर “प्रवासासाठी अयोग्य” असा फलक लावण्यात आला होता, परंतु पर्यटकांनी याकडे दुर्लक्ष केले. नवीन पूल बांधण्यासाठी 7-8 कोटींची निविदा मंजूर झाली होती, परंतु पावसामुळे कामाला विलंब झाला. सध्याची परिस्थिती काय? सोमवारी सकाळी NDRF चे पथक पुन्हा नदीपात्रात उतरले असून, बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्याला अडचणी येत आहेत, परंतु क्रेन आणि गॅस कटरच्या साहाय्याने अवशेष हटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर जाताना खबरदारी घेण्याचे आणि प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश ऐरणीवर पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटना ही पावसाळ्यातील पर्यटनस्थळांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. जीर्ण पूल, पर्यटकांची गर्दी आणि मुसळधार पावसाचा तडाखा यामुळे ही दुर्घटना घडली. NDRF आणि प्रशासन युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. परंतु बेपत्ता लोकांचा शोध आणि पावसाचे आव्हान यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. सरकारने नुकसानभरपाई आणि चौकशीचे आश्वासन दिले असले, तरी या दुर्घटनेतून धडा घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

इंद्रायणी नदीत पूल कोसळल्याने चार मृत; अनेकजण बेपत्ता

0
Newsworldmarathi Pune: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, यात अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३० ते ४० जण प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, रविवारी रात्रीपर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे इंद्रायणी नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पूल कोसळल्यावर त्यावर उभे असलेले अनेक पर्यटक अचानक नदीत पडले. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका” – मंत्री महाजन ही दुर्घटना घडताना पुलावर अनेक पर्यटक फोटो व सेल्फी काढण्यासाठी एकत्र जमले होते, हे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. यावर भाष्य करताना मंत्री महाजन म्हणाले, “पर्यटकांनी आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. केवळ फोटो किंवा सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घालू नये,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सध्या मदत आणि शोधकार्य सुरू इंद्रायणी नदीतील प्रवाह वेगवान असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही NDRF, SDRF व पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठी जाण्याचे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.

बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; कर्जमाफी ते शेतमजूर अन् ग्रामीण विकासासाठी आग्रह; जाणून घ्या प्रमुख मागण्या कोणत्या?

0
Newsworldmarathi Pune: Bachchu Kadu : मागील सात दिवासांपासून अन्नत्याग करत असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या हक्कांसाठी सरकारकडे खालील 14 मागण्या लावून धरल्या होत्या. त्यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे आंदोलन तीव्र झाले होते. अमरावतीपासून ते पुण्यापर्यंत त्याचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान, शेतकरी, मजुरांच्या, दिव्यांगांच्या हक्कासाठी मी हे आंदोलन करतो आहे. कर्जमाफीच्या मागणीत 90 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. दिव्यांगांचे मानधन वाढवणार आहेत, असे सांगत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर दोन ऑक्टोबर मंत्रालयात घुसणार असा इशारा देत बच्चू कडूंनी आपले उपोषण स्थगित केले. बच्चू कडूंच्या 14 प्रमुख मागण्या : दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी मानधन: दिव्यांग आणि विधवा महिलांना दरमहा 6,000 रुपये मासिक मानधन देण्यात यावे. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी: शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि शेतमालाला MSP (किमान आधारभूत किंमत) वर 20% अनुदान द्यावे. 7 एप्रिल 2025 च्या बैठकीनुसार शासन निर्णय: 7 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार तातडीने शासन निर्णय जारी करावा. युवकांसाठी रोजगार: युवकांना रोजगार उपलब्ध करावा किंवा सन्मानजनक वेतन द्यावे. सरकारी रिक्त जागा तातडीने भरणे आणि नव्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात. ग्रामीण घरकुलांसाठी अनुदान: शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी समान निकष लागू करून किमान 5 लाख रुपये अनुदान द्यावे. शेतमजुरांसाठी संरक्षण: शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यूसाठी आर्थिक सहाय्य द्यावे आणि शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे. MSP आधारित मजुरी आणि फळपिके: पेरणी ते कापणी सर्व कामांसाठी MSP आधारित मजुरी द्यावी. फळपिकांना 3:5 रेशो लागू करावा आणि दुग्ध व्यवसायाला MSP जोडावा. अन्यथा, तेलंगणाच्या धर्तीवर प्रति एकर 10,000 रुपये मदत किंवा भाव चढ-उतार निधी द्यावा. सेंद्रिय खतांना अनुदान: रासायनिक खतांप्रमाणे शेणखत आणि सेंद्रिय खतांना अनुदान द्यावे. मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी धोरण: मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न सोडवावेत. मनरेगा मजुरी वाढ: मनरेगा अंतर्गत मजुरी 312 रुपये वरून 500 रुपये करावी. निवासी अतिक्रमण नियमितीकरण: निवासी अतिक्रमणे नियमित करावीत. दुधाला आधारभूत किंमत: दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाय करावेत. गायीच्या दुधाला 50 रुपये/लिटर आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये/लिटर आधारभूत किंमत द्यावी. कांदा निर्यातबंदी टाळणे: कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी बाजारभाव 40 रुपये/किलो होईपर्यंत निर्यातबंदी लागू करू नये. ऊस पिकाला योग्य दर: 2025-26 साठी ऊस पिकाला 4,300 रुपये/टन (1% रिकव्हरी) आणि 11% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP द्यावे. स्वतंत्र रिकव्हरी यंत्रणा स्थापन करावी आणि 15 दिवसांत पेमेंट न झाल्यास व्याजासह वसुलीचे अधिकार स्थानिक यंत्रणेला द्यावेत. ठोस निर्णयाची प्रतीक्षा बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, आणि ग्रामीण समाजाच्या हक्कांसाठी 7 जून 2025 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे तिवसा वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज व्यक्त केली आहे. 16 जूनपासून जलत्याग करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले असले, तरी ठोस निर्णयाची प्रतीक्षा आहे. आंदोलनाचे पुण्यात पडसाद पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कर्जमाफी आणि कडू यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. या आंदोलनाने अमरावतीपासून पुण्यापर्यंत व्यापक पडसाद उमटले असून, सरकार कशी प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हरित ऊर्जेला गती द्या! ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रात जनतेला स्वस्त आणि मुबलक वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला हरित ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी कालबद्ध नियोजन आणि वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पीएम सुर्यघर: मोफत वीज योजनें अंतर्गत सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी महाऊर्जाने सर्वेक्षण त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. मॉडेल सोलर व्हिलेजसाठी महाऊर्जा आणि महावितरणने संयुक्तपणे काम करावे, तसेच गती शक्ती योजनेच्या धर्तीवर सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. वीज गळती कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या थकबाकी वसुलीची योजना आणि जनजागृतीवरही भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासासाठी संशोधन, कौशल्य विकास आणि शाश्वत योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी ऊर्जा विभागातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे (दूरदृश्यप्रणालीद्वारे), राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात पावसाचा हाहाकार ! दिवेघाटात धबधब्यांचे रौद्र रूप, पिंपरीत वाहने वाहून गेली; गेस्ट हाऊसही जलमय

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने थैमान घातले. दिवे घाट परिसरात ढगफुटी झाल्याने धबधबे रौद्र रूपात वाहताना दिसले. घाटातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली उतरल्याने सखल भाग जलमय झाले. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, आयबी गेस्ट हाऊससारख्या महत्त्वाच्या शासकीय इमारतीतही पाणी शिरले. गेस्ट हाऊसमध्ये आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वास्तव्याची सोय असून, जिन्यापर्यंत पाणी साचल्याने मोठा गोंधळ उडाला. पिंपरी चिंचवडमध्ये चऱ्होलीतील ओढा ओसंडून वाहत गेल्याने चार ते पाच वाहने प्रवाहात वाहून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने क्रेनच्या सहाय्याने वाहने बाहेर काढली. हिंजवडी आयटी पार्क परिसरात देखील मुसळधार पावसाचा फटका बसला. अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने रस्ते नद्यांमध्ये रूपांतरित झाले. गुडघाभर पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आणि अनेक दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात अडकली. गेल्या आठवड्यात नालेसफाई करण्यात आली असली तरी पुन्हा एकदा पाणी साचल्यामुळे प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनावर प्रश्नचिन्ह हिंजवडीत अवघ्या तासाभराच्या पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. गेल्या आठवड्यातील पाणी साचण्याच्या घटनेनंतर प्रशासनाने नालेसफाई केली असली, तरी पावसाळ्यापूर्वीच्या कामात सुधारणा आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक वाहने पाण्यात अडकली, तर काही ठिकाणी पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत पोहोचली.

“महाराष्ट्र पोलिसांचा गौरव ! 11 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट अन्वेषण पदक”

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना 2022 साठीचे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात आले. शुक्रवारी (13 जून 2025) पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात आयोजित समारंभात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना पदके आणि प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. 2018 ते 2022 या कालावधीत राज्यातील 54 पोलीस अधिकाऱ्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त, मुंबई: विधानसभा निवडणुकीदरम्यान सोलापूर ग्रामीणमधील पंचायत समिती सचिवाच्या खुनाचा तांत्रिक पुराव्यांद्वारे उलगडा करून तीन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा मिळवून दिली. प्रमोद तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुर्ला: वाशी येथील अज्ञात महिलेच्या खुनाचा डीएनए आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 20 दिवसांत उलगडा. मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक, सोलापूर ग्रामीण: अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरण आणि खुनाचा फॉरेन्सिक आणि सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा. दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, कोल्हापूर: लोणावळ्यातील 66 लाखांच्या दरोड्याचा 7 दिवसांत छडा लावून 20 आरोपींना अटक. अशोक विरकर, पोलीस अधिक्षक, दहशतवाद विरोधी पथक: सांगलीतील 7 वर्षीय मुलीच्या खुनाचा तपास करून अल्पवयीन आरोपीला 12 वर्षांची शिक्षा मिळवून दिली. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर: अहिल्यानगरमधील महिलेच्या खुनाचा 2 दिवसांत तांत्रिक तपासाद्वारे उलगडा. राणी काळे, सहायक पोलीस निरीक्षक, नवी मुंबई: 73 लाखांचा 377 किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना 13 वर्षे कारावास. दिपशिखा वारे, पोलीस निरीक्षक, मुंबई: कोविड लसीकरण फसवणुकीच्या प्रकरणात 11 आरोपींना अटक, 2259 पानांचे दोषारोपपत्र सादर. सुरेशकुमार राऊत, पोलीस उपअधिक्षक, लातूर: बँक दरोड्यातील 2.51 कोटींचा मुद्देमाल जप्त करून सर्व आरोपींना अटक. जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिरा-भाईंदर: सराफा दुकान दरोड्यातील 1.54 कोटींचा मुद्देमाल जप्त, मोक्का अंतर्गत कारवाई. समीर अहिरराव, पोलीस निरीक्षक, वसई विरार: ज्वेलर्स शॉप खुनाचा तपास करून सशस्त्र हल्लेखोरांना अटक. पुरस्कार निवड प्रक्रिया राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग, विशेष महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने अर्जांची कसून पडताळणी करून 22 अधिकाऱ्यांची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली. यापैकी 11 अधिकाऱ्यांची अंतिम निवड झाली. या कार्यक्रमाला अतिरिक्त महासंचालक सुनिल रामानंद, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली, अधीक्षक पल्लवी बर्गे, सौरभ आग्रवाल, पी. आर. पाटील, वैशाली माने यांच्यासह पदक विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे यशस्वी तपास करून महाराष्ट्र पोलिसांचा गौरव वाढवला.

“महाराष्ट्रात पावसाचा धडाका ! मुंबई, ठाण्यासह कोकणात आज रेड अलर्ट, पुढचे 24 तास ठरणार निर्णायक”

0
Newsworldmarathi Mumbai: Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून, रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातही जोरदार पावसाची शक्यता असून, या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांसह राज्याच्या इतर भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. हवामान खात्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काळजी घ्या, सुरक्षित रहा! राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. ढगफुटीसदृश पावसाचे चित्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुण्यात पावसाचा जोर कायम गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड भागात 46 मिमी, तर शिवाजीनगर भागात 26.5 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी(15 जून) साठी पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतात उष्णतेचा कहर, दक्षिणेत मुसळधार पावसाने हाहाकार देशाच्या उत्तर आणि दक्षिण टोकांमध्ये हवामानाची स्थिती एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. उत्तर भारतात तापमानाने उच्चांक गाठताना, दक्षिण भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीसह अनेक भागांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः हरियाणामधील ९ जिल्ह्यांमध्ये तापमान ४८ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतात पावसाचा कहर तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यात वीज पडल्याने ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ५ महिला आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हवामानाच्या या टोकाच्या स्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. उत्तर भारतात उष्माघाताचा धोका वाढला असून, दक्षिण भारतात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.

Air India Plane Crash : विमान अपघाताने हादरला महाराष्ट्र ! १२ जणांचा मृत्यू; पायलट, क्रू मेंबर्ससह प्रवाशांची धक्कादायक यादी समोर

Newsworldmarathi Gujrat : Air India Plane Crash : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा टेकऑफनंतर अवघ्या १२-१५ सेकंदांत भीषण अपघात झाला. मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर विमान कोसळल्याने २४१ प्रवासी, क्रू मेंबर्स आणि जमिनीवरील २४ जणांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला. २४२ प्रवाशांपैकी केवळ एकजण, रमेश विश्वकुमार, चमत्काराने वाचला. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील १२ जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील मृतांची यादी कॅप्टन सुमीत सभरवाल (मुंबई, चांदिवली) – मुख्य पायलट. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांची बहीण रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली. सिविक कुंदर (मुंबई, बोरिवली) – को-पायलट. अपर्णा महाडिक (मुंबई, मूळ चिपळूण) – क्रू मेंबर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी. मैथिली पाटील (नवी मुंबई, न्हावा) – क्रू मेंबर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (१३ जून) सकाळी १० वाजता त्यांच्या घरी भेट देणार आहेत. रोशनी सोनघरे (डोंबिवली) – २७ वर्षीय क्रू मेंबर, राजाजी पथ येथील उमिया कृपा सोसायटीत कुटुंबासह राहत होत्या. दीपक पाठक (बदलापूर) – ११ वर्षांपासून एअर इंडियात क्रू मेंबर, कात्रप येथील रावल कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. महादेव पवार (पंढरपूर, सध्या अहमदाबाद) – प्रवासी. आशा पवार (पंढरपूर, सध्या अहमदाबाद) – महादेव यांच्या पत्नी, प्रवासी. मयूर पाटील (महाराष्ट्र, माहिती अपुरी) – प्रवासी. यशा कामदार (नागपूर, सध्या अहमदाबाद) – पती, मुलगा आणि सासूसह लंडनला निघाल्या होत्या. रक्षा मोदा (नागपूर, सध्या अहमदाबाद) – यशा यांच्या सासू, प्रवासी. रुद्र मोदा (नागपूर, सध्या अहमदाबाद) – यशा यांचा १.५ वर्षांचा मुलगा, प्रवासी. करुण कहाण्या : सुमीत सभरवाल यांच्या घरी केवळ वडील राहत होते. त्यांची बहीण अहमदाबादला रवाना झाली आहे. अपर्णा महाडिक यांच्या मृत्यूने चिपळूण आणि मुंबईतील कुटुंबीय स्तब्ध झाले. रोशनी सोनघरे यांचे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते. दीपक पाठक यांनी टेकऑफपूर्वी आईशी बोलले होते, तोच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. यशा कामदार यांचे कुटुंबीय नागपूरहून अहमदाबादला रवाना झाले आहेत. दरम्यान, DGCA आणि बोईंगने अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. एक ब्लॅक बॉक्स सापडला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधील माहिती अपघाताच्या कारणांचा उलगडा करेल, अशी आशा आहे. ही दुर्घटना महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का आहे. टाटा समूहाकडून 1 कोटींची मदत अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फाइट AI‑171 च्या भयंकर अपघातानंतर, टाटा समूहाने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा खर्च या समूहाकडून निघणार आहे. तसेच बी.जे. मेडिकल कॉलेजचं वसतीगृह, पुन्हा बांधून देण्यात येणार आहे. असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.

Air India Plane Crash : सीटसह बाहेर फेकला गेलो, एअर होस्टेस-काका-काकी जळत होते; बचावलेल्या रमेशचा थरारक अनुभव

Newsworldmarathi Gujrat: Air India Plane Crash : अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा अवघ्या १२-१५ सेकंदांत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि मेघानीनगर परिसरातील २४ रहिवाशांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला. मात्र, या भयंकर अपघातातून एकमेव प्रवासी, ४० वर्षीय रमेश विश्वकुमार (सीट क्रमांक ११ए), चमत्कारिकरीत्या वाचला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली. रमेशने आपला थरारक अनुभव सांगितला: “माझी सीट असलेला विमानाचा भाग इमारतीच्या खालच्या बाजूला आदळला. वरच्या भागात प्रचंड आग लागली होती, जिथे बरेच जण अडकले होते. मी सीटसह खाली फेकला गेलो. तुटलेल्या दरवाजातून रिकामी जागा दिसली, तिथून मी बाहेर पडलो. दुसऱ्या बाजूला भिंत होती, तिथून कोणीही बाहेर येऊ शकले नाही.” त्याने पुढे सांगितले, “माझ्या डोळ्यांसमोर दोन एअर होस्टेस, एक काका आणि काकू जळत होते.” रमेशचा डावा हात गंभीरपणे भाजला, पण तो चमत्काराने वाचला. दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर) सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या ब्लॅक बॉक्समुळे अपघाताच्या कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या भीषण दुर्घटनेच्या तपासाला दिशा मिळेल.

बकरी ईदनंतर काळाची झडप ! पिंपरीचा २२ वर्षीय इरफान विमान अपघातात गमावला, कुटुंबीयांचा आक्रोश

0
Newsworldmarathi Pune : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा टेकऑफनंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिंपरी-चिंचवडच्या संत तुकारामनगर येथील २२ वर्षीय इरफान शेख, जो एअर इंडियाचा कॅबिन क्रू मेंबर होता, याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह २४२ जण होते, यापैकी केवळ एक प्रवासी वाचला. या अपघाताने इरफानच्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. इरफान गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियात कार्यरत होता. सुरुवातीला तो डोमेस्टिक फ्लाइट्सवर आणि नंतर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर कॅबिन क्रू म्हणून काम करत होता. मूळचा साताऱ्यातील मेढा येथील असलेले शेख कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून पिंपरीत स्थायिक आहे. इरफानच्या कुटुंबात आई-वडील, मोठा भाऊ, आजी-आजोबा आहेत. नुकताच बकरी ईद साजरी करण्यासाठी तो घरी आला होता, आणि कुटुंबासह आनंदाचे क्षण घालवून परतला. मात्र, त्याच्या जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. विमान मेघानीनगर परिसरातील डीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले, ज्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले आणि जमिनीवर २४ जणांचा मृत्यू झाला. एकूण २६५ जणांचा या अपघातात बळी गेला. इरफानचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीय अहमदाबादला रवाना झाले असून, डीएनए तपासणीनंतरच ते सुपूर्द केले जाईल. अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी सांगितले की, एकमेव वाचलेल्या प्रवाशावर उपचार सुरू आहेत. इरफानच्या निधनाने पिंपरीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.