Newsworld marathi Mumbai : मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री रेश्मा शिंदे अखेर पवनबरोबर लग्नगाठ बांधत अडकली. थाटामाटात पार पडलेल्या लग्नसोहळ्याचे फोटो रेश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकांमुळे रेश्मा घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावर तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रेश्मा नेमकं कोणाशी लग्न करतेय याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.पहिलं केळवण, घरगुती मेहंदीसोहळा, हळदी समारंभ, होणाऱ्या नवऱ्याची ओळख असा प्रवास करत आज रेश्मा आणि पवन साता जन्माचे सोबती झाले आहेत. अभिनेत्रीने लग्न लागताना गुलाबी रंगाची साडी नेसली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या लूकमध्ये रेश्मा अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या नवऱ्याने लग्न लागताना ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी आणि रेश्माच्या साडीला मॅचिंग असा त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.