Newsworldmarathi Pune : परभणी येथे संविधानाच्या अवमानानंतर घडलेल्या घटने संदर्भात पोलिसांनी केलेल्या कॉबिंग ओपारेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली. रविवारी यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला. शहिद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे; दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कोंबींग ऑपरेशनचे आदेश देणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि आंबेडकरी वसाहतीमध्ये वाहनाची तोडफोड करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, सदर प्रकारणाची सीबीआय चौकशी करा आदी मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रशासना विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या अवरामध्ये संविधानाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. त्यातील मुख्य आरोपी व त्या मागील कटकारस्थान करणारे यांना कठोर शिक्षा करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या हेतुने मोठे जनअंदोलन केले गेले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कॉबिंग ओपारेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली. रविवारी यातील मूळचा पुणे जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रशासना विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी राज्य सचिव बाळासाहेब जानराव, राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, संगीता आठवले, विशाल शेवाळे, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, राहुल डंबाळे, निलेश अल्हाट, बापूसाहेब भोसले, यशवंत नडगम, मिना मालटे, संदीप धांडोरे, अविनाश कदम, चांदणी गायकवाड, मिनाज मेनन, माहादेव कांबळे, संतोष खरात, मुन्ना बक्षशेख, मंगल रासगे, राजेश गाडे, एस. बी. गायकवाड, भारत भोसले, विनोद टोपे, आशीष भोसले, विरेन साठे, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, अमित सोनवणे, सुन्नाबी शेख, संतोष गायकवाड, सुरज गायकवाड, रामभाऊ कर्वे, शंशाक माने, करण सोरटे, रविन्द्र कांबळे, सुशील मंडल, रोहित कांबळे, उमेश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
परशुराम वाडेकर म्हणाले, परभणी येथे झालेल्या पोलिसांच्या कॉबिंग ऑपरेशन मध्ये पुण्यातील सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी जे कॉबिंग ऑपरेशन केले ते केवळ दलित व बौद्ध वस्ती असलेल्या ठिकाणी ठरवून केलेले आहे. जय भीम लिहिलेल्या गाड्या पोलिसांनी फोडलेल्या आहेत. कॉबिंग ऑपरेशन दरम्यान जखमी झालेल्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात न नेता पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने न होता पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे पोलिस कोठडीतच झाला. मात्र सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे सांगावे. तसेच अशा प्रकारे कायदे हातात घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, सदर प्रकारणाची सीबीआय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा वाडेकर यांनी दिला.
शहराध्यक्ष संजय सोनावणे म्हणाले, परभणीतील पोलिसांच्या कोंबीग ऑपरेशन मध्ये पुण्यातील सोमनाथ सुर्यवंशी हा सुशिक्षित तरूण मृत्यूमुखी पडला. पुण्यात त्याला लॉ कॉलेजला प्रवेश न मिळाल्याने तो परभणी येथे लॉ चे शिक्षण घेत होता. अशा भविष्यात वकील होवू पाहणाऱ्या मुलाचाच कायद्याच्या रक्षकांनी बळी घेतला आहे. ही शोकांतिका आहे. या कोंबीग ऑपरेशन चे आदेश देणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधीतावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब बडतर्फ करावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा भविष्यात आम्ही महाराष्ट्र बंद करू असा इशारा त्यांनी दिला.