Newsworldmarathi Kolhapur : यश मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट उपयुक्त ठरत नाही. त्यासाठी ध्येय निश्चित करूने ते साध्य करण्यासाठी खडतर मेहनतीची तयारी ठेवावी लागते. तरच शिखर गाठता येईल असे प्रतिपादक खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि इन्स्पायर एंडसीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कोल्हापूर टॅलेंट परीक्षेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात एक हजार ६०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा बक्षिस वितरण समारंभ व्हि. टी. पाटील सांस्कृतिक भवन टाकाळा येथे संपन्न झाला. यावेळी खा. महाडिक बोलत होते.
अरुंधती महाडिक यांनी विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी टॅलेंट सर्च परीक्षेचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, रोटरी क्लब कोल्हापूरच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, युथ आयकोन कृष्णराज महाडिक, बी. एम. हिडेकर, जिजाई मसालेच्या संस्थापिका वैशाली भोसले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कोल्हापूर लेंट सर्च परीक्षेत प्रथम आलेल्या अथर्व जोशी, वैष्णवी भुईक, आदित्य चेवारी, अभिनव पोवार, कल्याणी पाटील या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, भेट देवून गौरविण्यात आले.