Newsworldmarathi Pune : मराठी मातीशी घट्ट नाळ असणारे आणि आजच्या आधुनिक युगातसुद्धा एकत्र कुटुंबातून परस्परनात्याचे बंध घट्ट जपणारे शंकर मारणे व त्यांचे कुटुंबिय यांनी मोठ्या कष्टातून हे फार्महाऊस साकारलेले आहे. या फार्महाऊसचा काल पाचवा वर्धापनदिन होता. या निमित्ताने ‘श्रीमान योगी’मध्ये जाण्याचा सुंदर योग जुळून आला. प्रवेश करताच सह्याद्रीच्या पार्श्वभूमीवर दिमाखदार पद्धतीने झळकणारा भगवा झेंडा पाहताच अभिमानाने उर भरून आला. आत जाऊन पाहतो तर ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी साकारलेले व भाषा प्रभू डॉक्टर पंकज महाराज गावडे यांनी अनावरण केलेली छत्रपती शिवरायांची ११ फूट उंचीची भव्य मूर्ती अतिशय दिमाखदार दिसत होती. आपोआपच तिथे नम्रतेने आम्ही सारेच झुकलो.
मारणे कुटुंबियांनी अत्यंत आत्मीयतेने केलेले स्वागत स्वीकारत आम्ही आत प्रवेश केला. ‘श्रीमान योगी’मध्ये आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा सुंदर संगम उत्तमरीतीने साकारलेला आहे. एका बाजूला ऐतिहासिक शस्त्रांचे दालन आहे. तिथे उभारलेला भारतमातेचा पुतळा आपल्याला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देतो. तर दुसरीकडे उत्तम, अत्याधुनिक स्विमिंग टँकसुद्धा आहे. सर्व सुविधांनी युक्त आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद देणारी ही जागा आहे.
या वेळी माझ्यासमवेत आमदार शंकरभाऊ मांडेकर, भाषाप्रभू पूजनीय डाॅ. पंकजमहाराज गावडे, सुनिल शेठ मारणे, विवेकजी खटावकर, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाऊ चव्हाण, विलासराव भणगे, दिलीप काळोखे, दुर्गे महाराज, युवराज शिरोळे, शंकरराव कडू, सचिन डिंबळे, योगेश खैरे , संतोष पाटील, मंगेश अवसरे , नेमीचंद सोलंकी, संदीप फडके आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.