Newsworldmarathi Pune : पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव साहित्य, संस्कृती, आणि वाचनाच्या चळवळीला प्रोत्साहन देणारा एक आदर्श ठरतो आहे. साहित्याच्या चळवळीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी बालन ग्रुप नेहमीच पुढाकार घेत राहील. यामुळे साहित्य क्षेत्रातील नवीन संधी आणि पुस्तकप्रेमींचा उत्साह अधिक वाढण्यासाठी मदत होईल असे इंद्रनी बालन ग्रुपचे पुनीत बालन यांनी सांगितले.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या सहाव्या दिवशी वाचकांचा उत्साह आणि प्रतिसाद उल्लेखनीय ठरला आहे. राज्यभरातील मान्यवर व्यक्ती, लेखक, आणि साहित्यप्रेमी यांची उपस्थिती या महोत्सवाला अधिक उठावदार बनवत आहे.
पुण्यातील युवा उद्योजक आणि गणेश भक्त पुनीत बालन यांनी या महोत्सवात सहभाग घेतला, विविध भाषांतील पुस्तकांची खरेदी केली, आणि पुणेकरांच्या सहभागाचे कौतुक केले.