Newsworld marathi Kolhapur : तासगाव मतदारसंघात दिवंगत नेते आर.आर.पाटील हे आमदार बनले होते. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या दोन वेळा येथून आमदार राहिल्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या मुलाने म्हणजे रोहित पाटलांनी वयाची पंचविशी पूर्ण केल्यानंतर आमदारकीची तयारी सुरू केली. स्वतः शरद पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पाठबळ कसे मिळेल यासाठी लक्ष घातलं. या निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा पराभव केला. रोहित पाटील यांनी मलाही आमदार झाल्याचं तेव्हाच खरं वाटतं जेव्हा कोणी आमदार असं म्हणतं, माझे काही उत्तर भारतीय मित्र आहेत, त्यांनीही मला फोन करुन अभिनंदन करताना म्हटलं, भाई तू विधायक बन गया… तेव्हाच मला मी आमदार झालोय हे खरं वाटलं, असे रोहित पाटील यांनी म्हटलं. तसेच, मी महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार आहे, पण माझ्या काही मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदाचित मी देशातील सर्वात तरुण आमदार आहे. यापूर्वी झिशान सिद्दिकी हे 26 व्या वर्षी आमदार झालेले तरुण आमदार होते. त्यानंतर, तेलंगणातील रोहीत नावाचे एक आमदार आहेत, ज्यांचं वय 9,700 दिवस एवढं होतं. 9,700 दिवसांचा आमदार योगायोगाने तो रोहित होता. आता, 9400 दिवसांचा देशातील सर्वात तरुण आमदार मी आहे, जी माहिती मला आहे. 25 वर्षे 4 महिन्यांचा असताना मी आमदार झालो, असेही रोहित पाटील यांनी म्हटलं.
मी देशातील सर्वात तरुण आमदार- रोहित पाटील
Advertisements
RELATED ARTICLES