Newsworldmarathi Nagpur : आत्तापर्यंतचे नागपूरचे अधिवेशन हे विरोधी पक्षनेते गाजवत होते मात्र पहिल्यांदाच सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी नागपूरचे अधिवेशन गाजवले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली असून बीड येथे बिहारसारखे गुंडाराज सुरु झाल्याचा आरोप होत आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड येथे कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात विधानसभेत आज भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धक्कादायक दावे केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधी संतोष देशमुखला गाडीत उचलून न्यायचं महिलांची छेड काढली म्हणून त्याला माराहाण करायचा प्लान होता असा सनसनाटी आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला.
राज्याभरासह देशात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण तापलेलं आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनासह संसदेच्या अधिवेशनात देखील या विषय गाजला. याचप्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील आरोप केले होते. आता त्यांनी नवा आरोप करताना, पीकविमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट गेतल्यानंतर गौप्यस्फोट करताना ही मागणी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळेचे पडसाद अख्या राज्यात उमटताना दिसत आहेत. देशमुख यांच्या हत्येनंतर व्हिडिओ कॉल करून ‘आका’ला माहिती देण्यात आली होती. यामुळे याची एसआयटीमार्फत चौकशी व्हायला हवी. दोन दिवसांपूर्वी वाईन शॉपमध्ये जे ‘आका’ होते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या खरेदी केल्या क्या? याचाही तपास व्हायला हवा.