Newsworldmarathi Mumbai : भारतातील आघाडीचा, युवकांचा फॅशन ब्रँड फास्ट्रॅकने नवीन परफ्यूम रेन्ज आणून प्रीमियम मास फ्रॅग्रन्स बाजारपेठेत पदार्पण केल्याची व ब्रँडचा धोरणात्मक विस्तार केल्याची घोषणा केली आहे. परवडण्याजोग्या किमतींच्या आणि तरीही उत्तम दर्जाच्या सुगंधांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे, ती पूर्ण करण्यासाठी फास्ट्रॅकची नवीन रेन्ज रोजचे क्षण अधिक आनंदी, उत्साही बनवण्यासाठी व युवकांना त्यांची अनोखी स्टाईल व्यक्त करता यावी यादृष्टीने तयार करण्यात आली आहे.
फास्ट्रॅकची नवीन परफ्यूम रेन्ज जेन झीच्या वेगवेगळ्या गरजा आणि आवडनिवड पूर्ण करण्यासाठी, अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. सखोल ग्राहक संशोधनातून या ब्रँडने काही प्रमुख प्रसंगांवर आधारित वापर परिस्थिती ओळखून त्या प्रसंगांना अगदी साजेसे ठरतील असे सुगंध विकसित केले आहेत. भारतीय सुगंध बाजारपेठेत वेगाने वाढ होत आहे, खासकरून कमी किमतीच्या पण चांगल्या दर्जाच्या सुगंधांना खूप मागणी आहे (१००० रुपयांपेक्षा कमी). स्वतःची काळजी आणि स्वयं-अभिव्यक्ती यांना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांच्या नवीन पिढीमुळे ही वाढ होत आहे. वाढलेली जागरूकता आणि सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे जास्तीत जास्त लोक आपले व्यक्तिमत्व आणि जीवनशैली उंचावण्यासाठी सुगंधांच्या प्रभावाचा उपयोग करू लागले आहेत.
टायटन कंपनी लिमिटेडचे फ्रॅग्रन्सस अँड फॅशन ऍक्सेसरीज डिव्हिजनच्या सीईओनी सांगितले, “भारतातील सुगंध बाजारपेठेमध्ये लक्षणीय परिवर्तन घडून येत आहे. आमच्या संशोधनामध्ये आढळून आले आहे की, भारतीय युवक डिओड्रंटऐवजी फाईन फ्रॅग्रन्सकडे वळू लागले आहेत. पण त्यांना अशी उत्पादने हवी असतात ज्यांच्या किमती परवडण्याजोग्या असतील पण दर्जाच्या बाबतीत जराही तडजोड केलेली नसेल. आजचे युवक ग्राहक डिओड्रंट्सकडून फाईन फ्रॅग्रन्सकडे वळत आहेत, आमची ही नवीन रेन्ज परवडण्याजोग्या किमतीच्या पण प्रीमियम दर्जाच्या उत्पादनांच्या बाजारपेठेतील कमतरता भरून काढेल. या ग्राहकांसाठी फ्रॅग्रन्स ग्रूमिंगसाठी आवश्यक आहेच, पण त्याबरोबरीनेच स्वयं-अभिव्यक्ती व स्टाईल वाढवण्यासाठी देखील आवश्यक आहे. युवकांचा विश्वासाचा ब्रँड म्हणून आम्ही अशी नवीन परफ्यूम रेन्ज सादर करत आहोत जी ग्राहकांच्या नवीन मागण्या पूर्ण करेल, नव्या ग्राहकवर्गांची जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे प्रीमियम फ्रॅग्रन्स सादर करेल.”
या नवीन कलेक्शनमध्ये सहा वेगवेगळे आणि अनोखे सुगंध आहेत, काही विशिष्ट प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन त्यांना साजेसे ठरावेत या पद्धतीने ते विचारपूर्वक तयार केले आहेत. पुरुषांसाठी या रेन्जमध्ये आहे नाईट आउट, या सोफिस्टिकेटेड वूडी सुगंधामध्ये ओरिएंटल नोट्स वापरण्यात आल्या आहेत, रश हा फ्रेश वूडी सेन्ट प्रभावी, सतत व्यस्त असलेल्या व्यक्तिमत्त्वांसाठी तयार करण्यात आला आहे, आणि ईज हा क्लासिक सुगंध दररोज आत्मविश्वास मिळवून देतो. महिलांच्या कलेक्शनमध्ये – लश, स्वच्छंद व्यक्तींसाठी फुलांचा सुगंध, गर्ल बॉस, आधुनिक प्रोफेशनल्ससाठी प्रभावी फ्लोरल सेन्ट आणि वॉन्डर, मुक्त राहू इच्छिणाऱ्यांसाठी ओरिएंटल सुगंध यांचा समावेश आहे. फास्ट्रॅकच्या नवीन रेन्जची किंमत १०० मिलीसाठी ८४५ रुपये आहे, १००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांना लक्षणीय यश मिळण्याची संभावना खूप असल्याचे डोळ्यासमोर ठेवून या किमती ठेवण्यात आल्या आहेत.
या परफ्यूम्सच्या लॉन्चच्या निमित्ताने फास्ट्रॅकने दोन आकर्षक फिल्म्स रिलीज केल्या आहेत. जेन झीची मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा यामध्ये दर्शवण्यात आल्या आहेत. “सिक लीव्ह” मानसिक आरोग्य, स्वतःची देखभाल, कामाच्या संस्कृतीबाबत आव्हानात्मक पारंपरिक कल्पना यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. “डेट – ए ट्विस्ट यू डिडन्ट सी कमिंग” यामध्ये सहानुभूती, समजूतदारपणा आणि आधुनिक नात्यांमधील खरेपणा यांच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.