Homeपुणेसाने गुरुजी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

साने गुरुजी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

Newsworldmarathi Pune : राष्ट्र सेवा दल संचलित शिक्षण प्रशासक मंडळाची साने गुरुजी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.स्नेहसंमेलनाचा विषय भारतीय संविधान होता. दरवर्षी एक विषय घेऊन स्नेहसंमेलनासाठी कार्यक्रम बसवले जातात.

Advertisements

समाजात संविधानातील मूलभूत तत्वांची रुजवणूक व्हावी, संविधानाच्या कलमांआधारे देशाचा कारभार चालतो. आपली हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव झाली तरच आदर्श भारताचे स्वप्न आपणास पाहता येईल. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, महात्मा गांधींना अभिप्रेत भारत हवा असेल तर संविधान आधी समजून घेतले पाहिजे या उद्देशाने हा विषय ठेवण्यात आला. शासनानेही संविधान वर्ष उपक्रम जाहीर करत संविधान आधारित उपक्रम घेण्यास सुचवले आहे. त्यानुसार विविध नृत्य,नाटीका, मूकनाट्य, समूहगीत, संविधान उद्देशिका नृत्य बसवले गेले.

Oplus_131072

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आप्पी आमची कलेक्टर फेम प्रसिद्ध अभिनेत्री पुष्पा चौधरी,संस्थेचे सचिव शिवाजी खांडेकर, संचालक अलकाताई काळे, संचालक प्रा भगवान कोकणे, संचालक तुषार शिंदे, ॲड संपत कांबळे,प्राचार्या वृंदा हजारे , ऋतुजा जेवे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे परिस्थिती कशीही असली तरी प्रयत्नपूर्वक शिक्षण घेत स्वावलंबी होणे महत्वाचे आहे असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी पालकांना केले.

साने गुरुजींची १२५ वी जयंती नुकतीच पार पडली. खरा धर्म कोणता असेल तर तो प्रेम आहे. संविधानाला अभिप्रेत भावी नागरिक शाळेतून निर्माण करणे प्रशासक मंडळाचे कर्तव्य असून त्यासाठी लागेल ती तयारी करण्याचे आश्वासन अध्यक्षीय भाषणात शिवाजी खांडेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी संचालक प्रा भगवान कोकणे, पालक प्रतिनिधी प्रशांत सातपुते, राजेंद्र पोकळे यांनीही आपले विचार मांडले. मुख्याध्यापक मीना काटे यांनी प्रास्ताविकात शालेय प्रगती व भावी वाटचालीबाबत पालकांना सांगितले.पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व पालकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, संगिता गोवळकर, शितल खेडकर,मोनिका पोटे, शितल रुपनवर,लक्ष्मी कांबळे निशा नाईकनवरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोपान बंदावणे व तेजस्विनी फुलफगर यांनी केले तर आभार विठ्ठल शेवते यांनी मानले.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments