Homeपुणेविजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल

Newsworldmarathi Pune : पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असतात. अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे-अहिल्यानगर महामार्ग क्र.६० वर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ५ वा. पासून ते १ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाचे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.

Advertisements

याअंतर्गत चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहिल्यानगर कडून पुणे-मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील.

पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसरवरुन पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर-अहिल्यानगर मार्ग अशी वळविण्यात येतील. तसेच सोलापूर महामार्गावरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण येथे जातील.

मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जातील. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments