Homeपुणेब्रेकिंग! अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात बंद दाराआड चर्चा

ब्रेकिंग! अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात बंद दाराआड चर्चा

Newsworldmarathi pune : गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमधील संभाव्य एकत्रिकरणाची चर्चा चांगलीच गाजत आहे. बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाने या चर्चांना अधिक बळ दिले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित मंचावर येणं, तसेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेला संवाद यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisements

तथापि, याबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. शरद पवार यांनी यापूर्वी अजित पवार यांच्या भूमिकेबाबत टीका केली होती, त्यामुळे या एकत्रिकरणाच्या चर्चांना राजकीय रंग येणे स्वाभाविक आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना खूप महत्त्व दिलं जातं आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरू शकते.

यानंतर आता आजही अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी घाई घाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात अजित पवार ‘प्रेसिडेंट’ असं लिहिल्याला खोलीत शिरताना दिसत आहे. घाईघाईत त्यांनी पीएसोबत केलेला संवाद देखील समोर आला आहे.

कार्यक्रमाच्या व्हिडीओत अजित पवार घाईघाईत चालत येताना दिसत आहेत. आल्यानंतर ते ‘कुठे बसायचं रे’ असं पीएला विचारताना दिसत आहेत. यावर ‘साहेब इकडे आत बसलेत’ असं पीएने सांगितल्यावर अजित पवार प्रेसिडेंट बोर्ड लावलेल्या दरवाज्यातून आतमध्ये शिरले. यानंतर याच दालनात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

खरं तर, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं बोललं जातंय. मात्र मागील काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, यासाठी विठुरायाकडे साकडं घातलं होतं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधी दरी कमी झाल्याचं दिसत आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments