Newsworldmarathi Pune : पुणे शहर हरित करून प्रदूषण मुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्द्देशाने दाउदी बोहरा समाजाच्या वतीने आयोजित चौथे सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 तर्फे गो ग्रीन पुणेे रॅलीचे रविवार, 29 डिसेंबर 2024 सकाळी 9.30 वाजता आयोजन करण्यात आली होती .
या रॅलीत जानब अब्दली भाईसाब – अमिल साब पुणे, जनब इदरीस भाईसाब, मोइज़ जमाली, हुज़ेफा परदावाला, कुरेश घोडनादिवाला, फखरुद्दीन चोपड़ावाला, हमजा छत्रिस, अब्दुल कादिर सद्भावना सह लहान मुलांपासून तर वृद्धांचा समावेश होता. गो ग्रीन पुणे रॅली मध्ये 1२ कार आणि 60 बाइक्ससह ग्रीन पुणे कॅम्पेन आणि एक्स्पोचा प्रचार करणारे पोस्टर्स सह सहभागी झाल्या होत्या.
सदर गो ग्रीन पुणे रॅली पुणे कॅम्पपासून फ्लॅग दाखून सुरुवात करण्यात आली. सदर रॅली पुढे सोलापूर रोड, हडपसर, फातिमानगर, वानवडी, साळुंके विहार, एनआयबीएम, फाखरी हिल्स, एमजी रोड, लक्ष्मी रोड, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे विद्यापीठ रोड, बंड गार्डन रोड, कल्याणी नगर, विमान नगर, डेक्कन कॉलेज ग्राऊंड करीत पुन्हा कॅम्प येथे संपली .
सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 गेल्या तीन वर्षांपासून करित असून यंदा चौथे वर्ष आहे. सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 येत्या 4 जानेवारी 2025 पासून सुरु होत असून 6 जानेवारी पर्यंत डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे चालणार आहे. सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 व हरित पुणे मोहिम चा प्रचार व प्रसार करण्याच्या उ्द्देशाने गो ग्रीन पुणे रॅली आयोजित करण्यात आली होती.