Newsworldmarathi Pune : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मागण्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.
त्यांनी असेही सांगितले की, हे अधिवेशन राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि शिक्षणक्षेत्राच्या उन्नतीसाठी नवे मार्गदर्शन प्रदान करेल. मंत्री महोदयांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाला मान्यता देत त्यांना सक्षम पाठबळ देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे होणाऱ्या 52 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे औपचारिक निमंत्रण शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे सर,तसेच कार्याध्यक्ष प्रसन्न कोतुळकर उपस्थित होते. अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्या आणि शैक्षणिक व्यवस्थेतील योगदानावर चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.
हे अधिवेशन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि सकारात्मक परिणामकारक ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.