Newsworldmarathi Pune : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त यांच्या जयंतीनिमित्त बोपोडी चौक येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आरपीयआयचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांच्यासह आरपीयआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाडा येथे काढली. या शाळेच्या स्मारकासाठी रिपब्लिकन पक्षाने पहिले आंदोलन पुकारले. आंबेडकरी चळवळीच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. यानंतर अनेक पक्ष, संघटना सहभागी झाल्या. पण सुरुवात रिपब्लिकन पक्षाने केली या संदर्भात आम्ही कोर्टात सुद्धा गेलो.
आज येथे स्मारक होत आहे; यामध्ये आंबेडकरी चळवळीचा मोठा वाटा आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशांमध्ये गोरगरीब जनतेसाठी प्रचंड मोठे काम केले आहे. त्यांनी शोषित पीडित व स्त्रिमुक्तिच्या लढ्यासाठी व कल्याणासाठी स्त्रियांना सन्मान देऊन त्यांना सन्मानाने उभे करण्यामध्ये फुले दापत्यांचा खूप मोठा वाटा आहे.
अशा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारत सरकारने भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षा पासून रिपब्लिकन पक्ष आंबेडकरी चळवळ समाज करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमची विनंती आहे की महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्नाने सन्मानित करावे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सह्यांचे पत्र देखील पाठवण्यात येईल, असे ही परशुराम वाडेकर यांनी सांगितले.