Newsworldmarathi pune : आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या विश्व् गुजराती समाज च्या अहमदाबाद येथील मुख्यालयात संस्थेचे निवडणूक अधिकारी डॉ. प्रफुल्लभाई ठाकूर व ऍड. ए. एस. सय्यद यांच्या उपस्थितीमध्ये विश्व् गुजराती समाज च्या महासमितीची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीचे निकाल मा. निवडणूक अधिकारी यांनी नुकतेच जाहीर केले आहेत.
त्याद्वारे पुणे येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व, जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांची महासमितीच्या सभासद पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे पुण्यातील विशेषतः गुजराती समाजासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच या निवडीने राजेश शहा यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे.
विश्व् गुजराती समाज ही संस्था जागतिक पातळीवर गुजराती समाजातील व्यक्ती, व्यावसाईक, नोकरदार तसेच वैज्ञानिक, डॉक्टर्स इत्यादी सर्वच समाज घटकांसाठी कार्य करणारी विख्यात संस्था आहे. ही संस्था विविध देशांत कामानिमित्त जाणाऱ्या किंवा स्थायीक झाले असलेल्या गुजराती – भारतीय लोकांना सर्वतोपरी साहाय्य करण्यात अग्रेसर आहे. विदेशातील निर्वासितांना भेडसावणाऱ्या निरनिराळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्था कार्यरत आहे.
या संस्थेचे भारतातील मुखयालय अहमदाबाद गुजरात येथे आहे. सदर नुकत्याच निवडल्या गेलेल्या महासमितीच्या सभासदांमधून लवकरच संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार इत्यादी कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. मुंबई येथील लेखा प्रकाशन चे संपादक हेमराजभाई शहा हे गेली २० वर्षे संस्थेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. तर अमेरिका येथे स्थाईक असलेले सी. के. पटेल हे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत होते.
राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ व या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन आहेत. तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून श्री पूना गुजराती बंधु समाजाचे या ११० वर्षे पासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष तर महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव या पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार म्हणून ही ते कार्यरत आहेत.
याशिवाय अनेक संस्थांच्या विविध पदांवर राजेश शहा कार्यरत आहेत. त्यांना फेअर बिझनेस प्रॅक्टीसेस करीता देण्यात येणाऱ्या मानाच्या जमनालाल बजाज पुरस्काराने तीन वेळा सम्मानित करण्यात आले आहे. याशिवाय समाज परीवर्तन, समाजरत्न, आदर्श व्यापारी पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील प्रसिध्द उपक्रम लाडू-चिवडा चे ते जनक असून या उपक्रमासह राजेश शहा हे देखील गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ वल्ड रेकॉर्डस् मध्ये स्थान प्राप्त केलेले आहे.