Homeपुणेसिंधी प्रीमिअर लीगचे सहावे पर्व १५ फेब्रुवारीपासून

सिंधी प्रीमिअर लीगचे सहावे पर्व १५ फेब्रुवारीपासून

Newsworldmarathi pune : सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे सहावे पर्व यंदा १५ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत पिंपरी येथे होणार आहे. या स्पर्धेत यंदा १६ पुरुष, तर आठ महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहता येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisements

थेरगाव येथील हॉटेल नूरीयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, सागर तेजवानी यांच्यासह संयोजन समितीतील कमल जेठानी, रोनक पंजाबी, अवि इसरानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण आसवानी, अवि तेजवानी, सोमेश गिडवाणी, कुणाल गुडेला, रितेश आठवानी, मनीष गेरेजा, महिला प्रतिनिधी अवनी तेजवानी, खुशबू पंजाबी, हिना गोगिया, शिखा सेवानी, शीतल पहलानी, रुपाली पंजाबी संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.

हितेश दादलानी म्हणाले, “देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता व्हावी, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्राधान्य द्यावे आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. सिंधी समाजातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ‘सिंधी प्रीमियर लीग सीजन ६’चे उद्घाटन १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येतो”

कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या पाचही हंगामात या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यंदा स्पर्धेला अधिक व्यापक स्वरूप आले असून, खेळाडूंची संख्याही वाढली आहे. पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड, बंगळुरू, जयपूर येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. महिलांनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असून, यंदा महिलांचे आठ संघ स्पर्धा खेळणार आहेत. पुरुषांचे १६ संघमालक व महिलांचे आठ संघमालक आपल्या २४ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. पुरुष संघांची नवे सिंधी संस्कृतीवर आधारित, तर महिला संघांची नवे नद्यांवर आधारित आहेत.”

या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (डब्बू आसवानी फाउंडेशन, हिरानंद आसवानी), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम डेव्हलपर्स, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (जीएस असोसिएट्स, जितू पहलानी), एसएसडी फाल्कन (विक्रम रोहेडा फोटोग्राफी, विक्रम रोहेडा), इंडस डायनामॉस (साईबाबा सेल्स, रोहन गेहानी), दादा वासवानीज ब्रिगेड (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स, श्रीचंद आसवानी), झुलेलाल सुपरकिंग्ज (द कॉर्नर लाउंज, सनी गोगिया), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (ट्रिओ ग्रुप, बिपिन डाखनेजा), गुरुनानक नाइट्स (पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड, प्रकाश रामनानी), संत कंवरम रॉयल्स (विजयराज असोसिएट्स, क्रिश लाडकानी), आर्यन्स युनायटेड (विशाल प्रॉपर्टीज, विशाल तेजवानी), जय बाबा स्ट्रायकर्स (सुखवानी असोसिएट्स, सागर सुखवानी), सिंधी इंडियन्स (मनसुखवानी असोसिएट्स, मनीष मनसुखवानी), अजराक सुपरजायंट्स (लाइफक्राफ्ट रियल्टी, हितेश दादलानी) व पिंपरी योद्धाज (कुणाल कम्युनिकेशन्स, कुणाल लखानी) अशी या संघांची नावे आहेत.

महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स (तेजवानी हँडलूम्स अँड फर्निशिंग्स, अन्वी व अविनाश तेजवानी), गोदावरी जायंट्स (काजल ड्रेसेस, हरप्रीत सग्गु व पवन जयसिंघानी), झेलम क्वीन्स (सिटी कार्स, शिखा व रॉकी सेवानी), सिंधू स्टारलेट्स (जीएस असोसिएट्स, शीतल व जितू पहलानी), यमुना स्ट्रायकर्स (टॅलेन ट्रेजर ऍक्टिव्हिटी सेंटर, रिया व पवन कोटवानी), नर्मदा टायटन्स (आरआर सोल्युशन्स, रेशम वाधवानी व सपना मेलवानी), कृष्णा सुपरनोव्हाज (एसएसजीएन, रुपाली व प्रवीण पंजाबी) आणि इंद्रायणी थंडरबोल्ट्स (स्पोर्टिफाय, सई लॉन्स, अनिशा व करण आसवानी) यांचा समावेश आहे. महिलांमध्ये ९०, तर पुरुषांमध्ये २५१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

सुखवानी लाईफ स्पेसेस (विकी सुखवानी), एएनपी कॉर्प (ऋषी अडवाणी), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर सुखवानी), आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स (अनिल आसवानी), सिंग स्टील अँड अल्युमिनियम (मनजीत सिंग वालेचा), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), जय मोबाईल (गोपी आसवानी), रवी बजाज व रोहित तेजवानी, ग्रोफिन (अभिजित बोनगीरवार), एसएसडी एक्स्पोर्ट हॉंगकॉंग लिमिटेड (वरून वर्यानी), सेवानी इन्शुरन्स (हर्ष सेवानी), साईबाबा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (रोहन गेहाने), विशाल प्रॉपर्टीज (विशाल तेजवानी), बालाजी होम्स (आशुतोष चंदीरामानी), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), ग्लो वर्ल्ड (महान जेस्वानी), रिशा वॉच स्टोअर (जॅकी दासवानी), आकार कृष्णानी ग्रुप (राहुल कृष्णानी), सोलार्ज एनर्जी (विनीत व कौशिक धर्मानी), स्टीरलियन (राजकुमार जवारानी, देवेश चंचलानी), विक्रम रोहिडा फोटोग्राफी, सीजे हब (चिनू जैन), फेरो (कुणाल कुदळे) यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments