Newsworldmarathi Pune : धनकवडी, पुणे सातारा रस्त्यावरील श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या नुकत्याच झालेल्या सभेत २०२५ या वर्षाकरता डॉ. श्री मिहीर कुलकर्णी यांची अध्यक्षपदी आणि श्री सतिश कोकाटे यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी डॉ. मिहीर कुलकर्णी म्हणाले की, यावर्षी ट्रस्टचा तळजाई जवळील भक्त निवास आणि समाधी मठाच्या सभामंडपाचा जिर्णोद्धार करून सामाजीक उपक्रमांची व्याप्ती वाढवण्याचा संकल्प केला आहे. श्रींचा ७९ वा समाधी सोहळा २८ एप्रिल २०२५ ते ५ मे २०२५ या काळात साजरा होणार आहे. श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त संगीत महोत्सव, भजन, प्रवचन, कीर्तन, लघुरुद्र, पालखी सोहळा याचबरोबर ध्यान शिबिर, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी समाधी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.विश्वस्त मंडळात डॉ. पी. डी. पाटील, सुरेंद्र वाईकर, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी आणि प्रताप भोसले यांचा समावेश आहे.
विश्वस्त मंडळ
डॉ. श्री मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), श्री सतीश कोकाटे (सचिव), डॉ. पी. डी. पाटील, श्री सुरेंद्र वाईकर, श्री राजाभाऊ सुर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले..