Newsworldmarathi Pune : सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यापूर्वीही त्या परिसरात घडलेल्या हत्येसारख्या घटनांनी जनतेच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढवली आहे. ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करत राज्य सरकारला, विशेषतः गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याचे आवाहन केले आहे.
बारामतीतील कृषी प्रदर्शनादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका करत, कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी अधिक ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सूचित केले. या प्रकरणामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे आणि नागरिकांकडूनही कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे.