कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या रास्ता पेठेतील राजा धनराज मिरजी विद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावारविवार १९ जानेवारी २०२५ रोजी शाळेच्या क्रिडांगणावर सायं. 5 ते 8 हया वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
पुण्यातील रास्ता पेठ, नाना पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ, गणेश पेठ येथील गरजु आणि प्रतिकुल परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठी या शाळेने ९० वर्षे ज्ञानदानाचे काम केले आहे. ह्या शाळेत शिकलेल्या विविध क्षेत्रालील नामवंत विद्यार्थ्यांना ज्ञानाचा कर्तुत्वाचा व अनुभवाचा शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावलेला आहे.
स्नेह मेळाव्याचे हे वीसावे वर्ष असून गेली २० वर्षात माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी मोलाचा हातभार लावला आहे. त्यामुळे च शाळेची मोठ्या डौलाने प्रगतीवर वाटचाल सुरु आहे. ह्यावर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम घेण्याचे ठरविले असून त्यामध्ये मैदानी स्पर्धा, बौध्दिक स्पर्धा ह्या माजी विद्यार्थी संघाकडून घेण्यात येणार येणार आहेत.
माजी विद्यार्थ्यांना स्नेह मेळाव्यासंबंधी काही माहिती हवी असल्यास मा. प्राचायर्च श्री. रविंद्र साळुंखे मो. 9890076007, नितीन लचके मो. 9881351009 व श्री सागर पवार मो. 8087049712 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघाचे वतीने करण्यात आले आहे.