Homeपुणेहिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण

हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण

Newsworldmarathi Pune : हिंदू गर्जना प्रतिष्ठान युथ असोसिएशन व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ चा आखाडा येत्या दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisements

शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या लोगोच्या अनावर प्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले की, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच पुनीत बालन ग्रुप पुढाकार घेतो. हिंदू गर्जना चषक या निमित्ताने मातीतल्या खेळाशी कुस्तीची अधिक जवळून जोडले जाता येईल याचा आनंद आहे. तसेच या स्पर्धेत आम्ही एकूण 42 लाखांची भरघोस बक्षीसे देणार असून प्रथम क्रमांकास थार भेट देण्यात येणार आहे.

भाजपचे शहराध्यक्ष व हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे म्हणाले, महाराष्ट्र केसरीच्या तोडीस तोड ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा दि. ७, ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एसपी कॉलेज महाविद्यालय टिळक रोड पुणे येथे भरवण्यात येणार आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments