Newsworldmarathi Pune : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यासंदर्भात पवारांना माध्यमांनी विचारले असता, पवार भलतेच भडकले. ‘मी म्हणतो थोडी कळ काढा. थोडा धीर धरा, सगळं काही समोर येत. अस म्हणत पवार माध्यमांवर टोलेबाजी केली.
विधानसभा निवडणुकी दरम्यान चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या असं मत अजितदादांनी यावेळी व्यक्त केलं. म्हणाले. 23 तारखेला मतमोजणी होती आणि त्याच्या आदल्या दिवशी 22 तारखेला देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी होते, एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी होते, तर आम्ही देवगिरीवर होतो. त्यावेळी संध्याकळी आम्ही बातम्या पाहत होतो.
तेव्हा आमच्या विरोधकांमध्ये कुणाला कुठलं डिपार्टमेंट द्यायचं याची चर्चा सुरू होती, महाविकास आघाडीतल्या शिवसेनेने हॉटेल बुक केलं होतं, राष्ट्रवादीने हॉटेल बुक केलं होतं, काँग्रेसने हेलिकॉप्टर, विमान तयार ठेवलेली होती. सगळं प्लॅनिंग झालं होतं. असं सगळं माध्यमांवर दाखवण्यात येत होते, त्यावेळी मी देवेंद्रजींना फोन केला. त्यावेळी तेही म्हणाले मी पण बघतोय टीव्ही काय चाललं आहे, ते मला पण कळेना, अनेक चर्चा सुरू होत्या.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणीला सुरूवात झाल्यावर सकाळी मी देवगिरी बंगल्यावर टीव्ही बघत होतो, एका चॅनलने दाखवलं अजित पवार पोस्टल बॅलेटमध्ये मागे आहेत. बातमी चालली त्यावेळी आमच्या मातोश्रीनी काटेवाडी मध्ये मंदिराच्या समोर बसून माळ जपायला सुरू केली. मला माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला. बातम्या अशा दाखवत आहेत. आई काळजी करत आहे.
मी नंतर त्या संबंधीत चॅनलला फोन केला. मी संबंधितांशी बोललो ते लोक सांगायला लागले, पहिल्यापासून पोस्टल बॅलेटला पडणाऱ्या मतांमध्ये 75 टक्के मतं तुम्हाला आहेत आणि 25% मतं समोरच्याला आहेत. दादा अशी बातमी दाखवल्याशिवाय आमचा टीआरपी वाढत नाही आणि नंतर काढणारच आहे. काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर सांगणारच आहे, तुम्ही किती मतांनी पुढे आहेत ते.
चुकीच्या गोष्टीवर टीका- टिप्पणी करणे हा शंभर टक्के मीडियाचा अधिकार आहे. त्याबाबत दुमत असायचं काहीच कारण नाही. जे वाईट आहे, त्याला वाईट आणि चांगला आहे, त्याला चांगला म्हटलंतर त्यात काही बिघडत नाही. तेही अत्यंत आवश्यक आहे. सकारात्मक घडामोडी घडत असताना त्या गोष्टी देखील समाजासमोर येणं आवश्यक आहे.असं सांगत अजितदादांनी निवडणुकीचा किस्सा शेअर केला