Newsworldmarathi Pune : साने गुरूजींचे बालपण पालगडला गेले, सहा वर्षे त्यांनी प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सेवा केली.याच दरम्यान त्यांना गुरुजी ही आदराची पदवी लोकांनी दिली. अध्यापनासाठी साने गुरुजींची स्वतःची अशी एक पद्धत होती. म्हणून ते समाजासाठी आदर्श शिक्षक म्हणून गणले गेले.त्यांच्याप्रमाणेच सर्व शिक्षकांनी स्वतःची पद्धती विकसित करुन भावी पिढी समृद्ध करावी असे प्रतिपादन साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामराव कराळे यांनी केले.कै. चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक विद्यालय, वडगाव बु पुणे येथे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० या टप्प्यातील समारोप प्रसंगी ते बोलत होते.
इ २री,४ थी व ६ वी इयत्तेतील तिसऱ्या टप्प्यातील हे प्रशिक्षण होते.सदर प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम आराखडा,मूल्यांकन तसेच समग्र प्रगती पुस्तक याबाबत चर्चा झाली.यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विकास दांगट,चिरंजीव दांगट, मंजू मते,मधुरिमा देशमुख,सारंग पाटील, सोपान बंदावणे उपस्थित होते.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अविनाश महाजन,आर एन देशपांडे,सत्यवती कांबळे,व्ही डी महाजन,प्रिती जोशी, महेश माळी , बसवराज कांबळे, नितीन जोगदंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान बंदावणे यांनी केले, वैशाली रणधीर व अनिता स्वामी यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन श्रीनिवास शिंदे यांनी तर आभार दिपक अंदुरे यांनी मानले.


Recent Comments