Newsworld Pune : महागाईने गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. खाद्यतेल, धान्य, भाजीपाला, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
महागाईमुळे घरगुती बजेट विस्कळीत झाले असून, लहान-मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी अधिक पैसा खर्च करावा लागत आहे. विशेषतः घरकाम करणाऱ्या महिलांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे.
सप्टेंबरपासून महागाईने देशभरात पुन्हा डोकं वर काढलं असून, सर्वसामान्य जनतेचं जगणं अधिक कठीण झालं आहे. भाज्यापासून खाद्यतेल आणि लसणापर्यंत अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. विशेषतः गृहिणींच्या दैनंदिन बजेटला या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे.
खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. कांद्याच्या किंमतीत थोडासा उतार दिसला असला तरी लसणाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
लहान कुटुंबांपासून मोठ्या घरांपर्यंत महागाईने आर्थिक व्यवस्थापन कठीण केले आहे. “संसाराचा गाडा कसा हाकायचा?” हा प्रश्न गृहिणींना सतावत आहे.
महागाईचा सामना करताना महिलांना त्यांच्या आर्थिक व्यवस्थापन कौशल्याचा पूर्ण वापर करावा लागत आहे. तरीही वाढत्या किंमतींमुळे “सरकारने महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी गृहिणी करत आहेत.
गृहिणींच्या “नाके नऊ” आणणाऱ्या या महागाईवर सरकारने त्वरित कारवाई केली नाही, तर सामान्य जनतेचा रोष वाढण्याची शक्यता आहे.