Newsworld Mumbai : Devednra Fadanvis मागील आठ दिवसापासून सुरु असलेल्या मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती भारतीय जनता पार्टीने शिक्कामोर्तब आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे वाक्य बोलले होते. ते मी पुन्हा येईन .. मी पुन्हा येईन हे वाक्य खऱ्या अर्थाने खरे ठरत आहे. ते पुन्हा येत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, देवेंद्र फडणवीसच नव्याने मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याचवेळी फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवडही करण्यात आली आहे.
भाजप विधीमंडळ गटाने फडणवीस यांना एकमताने गटनेतेपदी निवडले, ज्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या महत्त्वाच्या बैठकीसाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस हे पूर्वीही राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव तसेच राजकीय खेळ कौशल्याचा विचार करूनच हा निर्णय झाला आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची पहिली आव्हानं म्हणजे महागाई, रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकासाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहेत. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून राज्यात स्थिर आणि विकासात्मक सरकार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.