Newsworld Pune : दि.१ डिसेंबर २०२४ रोजी बालेवाडी, पुणे येथे झालेल्या ३९ व्या महाराष्ट्र राज्य शुटिंग चैम्पियनशिप स्पर्धा २०२४ मध्ये ६५० पैकी ६३५.१ गुण करुन कु.शांभवी श्रावण क्षिरसागर हिने सीनियर जूनियर युथ व सब यूथ या चार प्रकारात ४ गोल्ड मेडल व ४५०००/- रुपये कॅश प्राइज़ मिळवून शांभावी ही महाराष्ट्र स्टेट चैम्पियन २०२४ ची मानकरी ठरली आहे .शांभवी ही मुळची पुण्यातील असून सध्या ती कोल्हापूर येथे राहते.
39 व्या महाराष्ट्र राज्य शूटिंग चैम्पियन स्पर्धा 2024 चे आयोजन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात एक डिसेंबर पासून सुरू आहे .शांभवी क्षीरसागर हिने सिनिअर ज्युनियर व सब यूथ अशा एकूण चारीही गटा मध्ये सुवर्ण पदक मिळवले असून ४५ हजार रुपयाचे विशेष पारितोषिक ही पटकावले आहे. अतिशय जिद्द आणि मेहनतीच्या बळावर तिने हे यश संपादन केले असून पुण्यातील क्रीडाप्रेमीनी व मार्गदर्शकांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले आहे .