Newsworldmarathi delhi : Mustafabad Building Collapsed: दिल्लीतील न्यू मुस्तफाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शक्ती विहारमध्ये एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 8 ते 10 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे.
नेमकं काय घडलं…
न्यू मुस्तफाबाद येथील शक्ती विहारमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाला शुक्रवार आणि शनिवारी रात्री 2:50 वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. 40 हून अधिक जण बचावकार्य करत आहेत.


Recent Comments